scorecardresearch

करोनासंबंधी औषधांवरील जीएसटी कपातीला मुदतवाढ

इंधनाच्या किमतीमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

करोनासंबंधी औषधांवरील जीएसटी कपातीला मुदतवाढ

जीएसटी परिषदेची आज लखनऊमध्ये बैठक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची  (१७ सप्टेंबर) लखनऊ  येथे बैठक होणार आहे. बैठकीमध्ये चार डझनाहून अधिक  वस्तूंच्या कर दराचा आढावा घेण्यात येणार आहे. शिवाय  करोनाकाळात  निवडक औषधांवर देण्यात आलेली कर सवलत ३१ डिसेंबरपर्यंत  वाढविण्याबाबत  निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

इंधनाच्या किमतीमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलला वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी कर कक्षेत आणण्याचा महत्त्वपूर्ण मुद्दा जीएसटी परिषदेत मंडळाच्या बैठकीच्या विषय पत्रिकेवर असू शकेल. झोमॅटो, स्विगीसारख्या फूड डिलिव्हरीवर जीएसटी लागण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-09-2021 at 00:15 IST