financial year September GST collection services merchants ysh 95 | Loksatta

जीएसटी संकलनातून सप्टेंबरमध्ये १.४५ लाख कोटी अपेक्षित

चालू वर्षांत मार्च महिन्यापासून जीएसटी संकलन १.४० लाख कोटींपेक्षा अधिक राहिले आहे. येत्या शनिवारी, १ ऑक्टोबरला सरकारकडून जीएसटी संकलनाची अधिकृत माहिती जाहीर केली जाईल.

जीएसटी संकलनातून सप्टेंबरमध्ये १.४५ लाख कोटी अपेक्षित
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

पीटीआय, नवी दिल्ली : वस्तू व सेवांच्या दरवाढीसह, त्यांची बळावलेली मागणी आणि व्यापाऱ्यांकडून वाढलेले कर-अनुपालन याच्या एकत्रित परिणामामुळे सप्टेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी संकलन हे १.४५ लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याची आशा सरकारने बुधवारी व्यक्त केली. चालू वर्षांत मार्च महिन्यापासून जीएसटी संकलन १.४० लाख कोटींपेक्षा अधिक राहिले आहे. येत्या शनिवारी, १ ऑक्टोबरला सरकारकडून जीएसटी संकलनाची अधिकृत माहिती जाहीर केली जाईल.

सरकारला आगामी सणासुदीचा काळ बघता, कर संकलनात सुरू असलेली वाढ अधिक आश्वासक वाटते. आधीच्या महिन्यांत म्हणजे ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन हे १.४३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते. तर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यायोगे १.१७ लाख कोटी रुपये जमा झाले होते. चालू आर्थिक वर्ष म्हणजेच २०२२-२३ मध्ये केंद्र सरकारला जीएसटीच्या माध्यमातून सुमारे १.५५ लाख कोटी रुपये सरासरी वार्षिक महसूल अपेक्षित आहे. चालू आर्थिक वर्षांतील एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत केंद्र सरकारला जीएसटीच्या माध्यमातून ७.४५ लाख कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. एप्रिलमध्ये सर्वाधिक १.६८ लाख कोटींचा विक्रमी महसूल मिळाला होता.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांना जामीन मंजूर

संबंधित बातम्या

अपेक्षेप्रमाणे रेपोदरात कपात, गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता

व्हिडिओ

ताज्या बातम्या
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण : आफताबच्या ‘नार्को’ चाचणीस न्यायालयाची परवानगी; हल्ला झाल्याने बंदोबस्तात वाढ
पंजाबमध्ये पाकिस्तानचे ड्रोन पाडले; ‘बीएसएफ’च्या महिला पथकाची कामगिरी
चिनी विद्यापीठांतून विद्यार्थ्यांची परत पाठवणी; करोना प्रसार टाळण्यासाठी खबरदारी
आरक्षित जागांवरील बिगरआदिवासी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे लाभ
आदित्य यांचे मुख्यमंत्र्यांना चर्चेचे आव्हान; ‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पाचा वाद