financial year September GST collection services merchants ysh 95 | Loksatta

जीएसटी संकलनातून सप्टेंबरमध्ये १.४५ लाख कोटी अपेक्षित

चालू वर्षांत मार्च महिन्यापासून जीएसटी संकलन १.४० लाख कोटींपेक्षा अधिक राहिले आहे. येत्या शनिवारी, १ ऑक्टोबरला सरकारकडून जीएसटी संकलनाची अधिकृत माहिती जाहीर केली जाईल.

जीएसटी संकलनातून सप्टेंबरमध्ये १.४५ लाख कोटी अपेक्षित
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

पीटीआय, नवी दिल्ली : वस्तू व सेवांच्या दरवाढीसह, त्यांची बळावलेली मागणी आणि व्यापाऱ्यांकडून वाढलेले कर-अनुपालन याच्या एकत्रित परिणामामुळे सप्टेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी संकलन हे १.४५ लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याची आशा सरकारने बुधवारी व्यक्त केली. चालू वर्षांत मार्च महिन्यापासून जीएसटी संकलन १.४० लाख कोटींपेक्षा अधिक राहिले आहे. येत्या शनिवारी, १ ऑक्टोबरला सरकारकडून जीएसटी संकलनाची अधिकृत माहिती जाहीर केली जाईल.

सरकारला आगामी सणासुदीचा काळ बघता, कर संकलनात सुरू असलेली वाढ अधिक आश्वासक वाटते. आधीच्या महिन्यांत म्हणजे ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन हे १.४३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते. तर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यायोगे १.१७ लाख कोटी रुपये जमा झाले होते. चालू आर्थिक वर्ष म्हणजेच २०२२-२३ मध्ये केंद्र सरकारला जीएसटीच्या माध्यमातून सुमारे १.५५ लाख कोटी रुपये सरासरी वार्षिक महसूल अपेक्षित आहे. चालू आर्थिक वर्षांतील एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत केंद्र सरकारला जीएसटीच्या माध्यमातून ७.४५ लाख कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. एप्रिलमध्ये सर्वाधिक १.६८ लाख कोटींचा विक्रमी महसूल मिळाला होता.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांना जामीन मंजूर

संबंधित बातम्या

Gold Silver: दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या भावात घसरण; जाणून घ्या आजचा दर
Gold-Silver Rate Today: सोने चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजची किंमत
Gold-Silver Rate Today: विकेंडला सोने-चांदीचे भाव वधारले; जाणून घ्या आजचा प्रति तोळ्याचा दर
‘निफ्टी’कडून १८,०००ची पातळी सर ; चार सत्रात ‘सेन्सेक्स’ची १५४१ अंशांची कमाई
आरोग्य विमा पॉलिसीची ‘पोर्टेबिलिटी’ सुलभ व शक्य!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या ‘पुणे बंद’ला व्यापाऱ्यांचा पाठिंबा
गुजरात निवडणुकीनंतर ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, अरविंद केजरीवालांनी मानले जनतेचे आभार; म्हणाले, “आम्ही केवळ…”
“देशासमोर आव्हानं असताना, जनतेचा विश्वास भाजपावर”, पंतप्रधानांची मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “ज्यांनी कधीच काँग्रेसला…”
Viral Video: काही सेकंदातच कोमोडो ड्रॅगनने हरणाला गिळलं, शेवटचा क्षण पाहिल्यानंतर अंगावर काटा येईल
पुणे : विनाअनुदानित शाळेतून अनुदानित शाळेत बदली स्थगितीच्या निर्णयाला विरोध