‘फिच’कडून देशाचे पतमानांकन ‘जैसे थे’

अर्थ-दृष्टिकोनाबाबत मध्यम कालावधीतील जोखीम निवळत जाईल, असाही फिचचा कयास आहे.

नवी दिल्ली : जागतिक पतमानांकन संस्था ‘फिच रेटिंग्ज’ भारताचे सार्वभौम पतमानांकन नकारात्मक दृष्टिकोनासह ‘बीबीबी – (उणे)’ पातळीवर मंगळवारी कायम राखले. प्रचंड मोठे सार्वजनिक कर्ज, कमजोर वित्तीय क्षेत्र, अडखळलेल्या स्थितीत असलेल्या काही संरचनात्मक सुधारणा हे नकारात्मक घटक असले तरी, बाह्य़ धक्क्य़ांना पचवू शकणारे उमदी विदेशी चलन गंगाजळी ही जमेची बाब असून, त्यामुळे मध्यम अवधीत अर्थव्यवस्थेच्या वाढीला असणारे धोके निवळतील, असा तिचा सकारात्मक सूरही आहे.

पतमानांकन आहे त्या पातळीवर कायम राखले जाणे हे अर्थव्यवस्थेतील दीर्घावधीसाठी अनिश्चिततेचा दृष्टिकोनालाच दर्शविणारे आहे. तथापि, कोविड-१९ साथीच्या परिस्थितीतून ज्या तीव्र गतीने देशाच्या अर्थव्यवस्थेने सावरून डोके वर काढले आहे आणि वित्तीय क्षेत्रावरील हलका होत असलेला ताण पाहता, अर्थ-दृष्टिकोनाबाबत मध्यम कालावधीतील जोखीम निवळत जाईल, असाही फिचचा कयास आहे. विद्यमान, मार्च २०२२ अखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षांसाठी फिचने ८.७ टक्क्यांचा वाढीचा, तर त्यानंतर आर्थिक वर्षांसाठी (२०२२-२३) १० टक्क्य़ांच्या वाढीचा आश्वासक अंदाज व्यक्त केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fitch retains rating with negative outlook on higher debt levels zws

Next Story
‘कन्साइ नेरॉलॅक’ला सणांच्या हंगामात मागणीतील दुप्पट वाढ अपेक्षित
ताज्या बातम्या