Former NSE chief Chitra Ramakrishna granted bail Delhi High Court ysh 95 | Loksatta

एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांना जामीन मंजूर

दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसई लिमिटेडच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण आणि माजी समूह संचालन अधिकारी आनंद सुब्रमणियन यांना जामीन मंजूर केला.

एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांना जामीन मंजूर
एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांना जामीन मंजूर

पीटीआय, नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसई लिमिटेडच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण आणि माजी समूह संचालन अधिकारी आनंद सुब्रमणियन यांना जामीन मंजूर केला. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरू असलेल्या एनएसईतील ‘सह-स्थान’ घोटाळय़ाप्रकरणी दोघांना चालू वर्षांत अटक करण्यात आली होती.

चित्रा रामकृष्ण यांच्यावर प्रशासकीय त्रुटी आणि कारभारातील हयगयीच्या प्रकरणी मे २०१८ मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यांनतर चालू वर्षांत २४ फेब्रुवारीला सीबीआयने त्यांना अटक केली होती. तर सुब्रमणियन यांना एनएसईतील ‘सह-स्थान’ (को-लोकेशन) घोटाळय़ाप्रकरणी सीबीआयने चेन्नई येथून अटक केली होती. अलीकडेच एनएसईच्या प्रमुखपदाचा चित्रा रामकृष्ण यांनी दुरुपयोग करत गोपनीय आणि संवेदनशील माहिती कथित ‘हिमालयातील योग्या’ला दिल्याचे प्रकरण चर्चेत आले.

हे योगी प्रकरण तसेच एनएसईतील ‘सह-स्थान’ घोटाळय़ाप्रकरणी भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’च्या अहवालातून पुढे आलेल्या नवीन तथ्यांच्या आधारे रामकृष्ण आणि सुब्रमणियन यांना अटक करण्यात आली होती. रामकृष्ण या एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ पर्यंत राष्ट्रीय शेअर बाजाराच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘सेन्सेक्स’ ५७ हजारांखाली

संबंधित बातम्या

टाटा ट्रस्टवर नेतृत्वबदलाची चर्चा निराधार!
सुरळीत अर्थव्यवस्थेला ‘कर’मात्रा लागू
Gold-Silver Price on 8 August 2022: सोने-चांदीचे दर स्थिर; जाणून घ्या आजचा भाव काय?
सरकारी तेल कंपन्यांना सहामाहीत १८,७९० कोटींचा तोटा; पेट्रोल-डिझेलची दरवाढीला पायबंदाचा फटका
‘टोयोटा-किर्लोस्कर मोटर’च्या विक्रम किर्लोस्कर यांचं निधन; ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्हिडिओ

ताज्या बातम्या
राज्यात १५ डिसेंबरपर्यंत कधीही पाऊस; हलक्या सरी ते जोरधारांची शक्यता
पुणे : गुजरातमधील विजयानंतर पुण्यात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
हिमाचल प्रदेश निवडणुकीवरून अजित पवारांचा नड्डांना खोचक टोला; म्हणाले, “जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांना…”
पुण्याच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष; महापालिका अधिकाऱ्यांबरोबर घेणार बैठक
पुणे: विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ‘पीएमपी’च्या खास फेऱ्या