इंधन किमती भडकणार

कच्चे तेल प्रति पिंप ७० डॉलपर्यंत जाण्याची भीती

कच्चे तेल प्रति पिंप ७० डॉलपर्यंत जाण्याची भीती

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख लंडन तसेच अमेरिकेच्या बाजारातील खनिज तेलाच्या किंमती येत्या कालावधीत अधिक उंचावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ब्रेंट प्रकारच्या खनिज तेलाचे दर प्रति पिंप ७० डॉलपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ब्रेंट आणि डब्ल्यूटीआय तेलाच्या किंमतीनी ८ फेब्रुवारी ते ५ मे २०२१ या कालावधीत अधिकच्या १० डॉलरने व्यापक श्रेणीत व्यापार केला. एमसीएक्स फ्युचर्समध्ये याच कालावधीत तेलाचे दर भारतीय चलनामध्ये ४,२०० ते ५,००० रुपये प्रति पिंप या श्रेणीत व्यापार करत होते.

डॉलर कमकुवत झाल्याने अमेरिका, चीन आणि युरोपमध्ये मागणी वाढण्याची शक्यता तसेच अमेरिकेतील तेलसाठय़ात घट, अमेरिकेतील इंधन शुद्धीकरण प्रकल्पातील उपयोग दरात वाढ, चीनच्या तेल आयातीत वाढ, अमेरिका आणि चीनमधील लसीकरण हे सध्या काळ्या सोन्यासाठी प्रोत्साहनपर घटक ठरत असल्याचे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी व्यक्त केले आहे. भारत, ब्राझील आणि जपानमध्ये करोनाच्या वाढत्या प्रसारातही तेलाच्या जागतिक मागणीत वाढीचे संकेत असल्यामुळे मे ते जुलैदरम्यान, ओपेक, रशिया आणि सदस्य राष्ट्रे तेल उत्पादनावरील निर्बंध टप्प्या टप्प्याने शिथील करतील, असेही माल्या म्हणाले.

जागतिक हेज फंड व्यवस्थापकांमधील आशावाद तेलाच्या किंमती वाढण्यासही प्रोत्साहनपूरक ठरत असून इराण आणि ओपेक देशांकडून वाढता तेलपुरवठा हा तेलाच्या किंमतीतील संभाव्य वाढीसाठी अडथळा ठरू शकतो, ही चिंतेची बाब असल्याचे माल्या यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात डब्ल्यूटीआय तेलाचे दर (६४ डॉलर प्रति पिंप) महिन्याच्या कालावधीत ७०डॉलर प्रति पिंप बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर एमसीएक्स ऑइल फ्युचर्स (४,७८८ रुपये प्रति पिंप) याच कालावधीत ५,१०० रुपये प्रति पिंप प्रतिदिनपर्यंत कमी होण्याची शक्यता असल्याचे माल्या यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fuel rates likely to increase again due to crude oil rate hike in international market zws

ताज्या बातम्या