gas price hike domestic piped gas likely to increase by rs 6 cng by rs 8 to 10 zws 70 | Loksatta

नैसर्गिक वायू दरवाढीने महागाईची झळ ; घरगुती पाइप गॅस सहा रुपयांनी, सीएनजी ८ ते १० रुपयांनी महागण्याची शक्यता 

केजी खोऱ्यामधील डी ६ सारख्या नवीन क्षेत्रातून उत्पादित वायूच्या किमती प्रति युनिट ९.९२ डॉलरवरून १२.४६ डॉलपर्यंत वाढवल्या आहेत.

नैसर्गिक वायू दरवाढीने महागाईची झळ ; घरगुती पाइप गॅस सहा रुपयांनी, सीएनजी ८ ते १० रुपयांनी महागण्याची शक्यता 
(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : गेल्या सप्ताहअखेरीस सरकारने देशांतर्गत उत्पादिते नैसर्गिक वायूच्या किमतीत विक्रमी ४० टक्क्यांची वाढ केल्याचा परिणाम म्हणून, वीज, खते आणि वाहनांच्या इंधनांसह, स्वयंपाकाच्या इंधन खर्चात लवकरच मोठय़ा दरवाढीची झळ सर्वसामान्यांना सोसावी लागू शकते. विश्लेषकांनी सोमवारी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, सीएनजीच्या किमतीत किलोमागे थेट ८ ते १२ रुपयांची आणि पाइपद्वारे घरोघरी स्वयंपाकगृहापर्यंत पोहोचणाऱ्या पीएनजीमध्ये प्रति युनिट किमान ६ रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

सरकारने गेल्या आठवडय़ात जुन्या (एपीएम) वायू साठय़ांमधून उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किमती सध्याच्या प्रति युनिट (एमएमबीटीयू) ६.१ डॉलरवरून ८.५७ डॉलरवर नेण्याचा निर्णय घेतला. केजी खोऱ्यामधील डी ६ सारख्या नवीन क्षेत्रातून उत्पादित वायूच्या किमती प्रति युनिट ९.९२ डॉलरवरून १२.४६ डॉलपर्यंत वाढवल्या आहेत.

देशात उत्पादित होणाऱ्या सर्व वायूंपैकी दोनतृतीयांश वायू हा एपीएम क्षेत्रातून येतो. हा वायू वाहनांसाठी इंधनरूपात वापरात येणाऱ्या सीएनजीमध्ये रूपांतरित केला जातो आणि स्वयंपाकासाठी पीएनजी म्हणून वापरात येतो.

कोटक इन्स्टिटय़ूशनल इक्विटीजच्या टिपणानुसार, एपीएम वायूच्या किमती एका वर्षांत जवळपास पाच पट वाढल्या आहेत – सप्टेंबर २०२१ मध्ये प्रति युनिट (एमएमबीटीयू) १.७९ अमेरिकी डॉलर असलेल्या किमती प्रति युनिट ८.५७ डॉलरवर गेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर वायूंच्या किमतीत वाढ झाल्याने ही दरवाढ करण्यात आली असल्याचे सरकारने म्हटले आहे.

कोटकच्या मते, शहर वायू वितरण कंपन्यांना नजीकच्या काळात त्यांच्या मिळकतीवर परिणाम होणार नाही हे पाहताना सीएनजी व पीएनजीच्या  किमती वाढवाव्या लागतील.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
EPF खात्याचं केवायसी ऑनलाइन अपडेट कसं करायचं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया आणि फायदे

संबंधित बातम्या

NDTV-Adani Deal: प्रणॉय रॉय, राधिका रॉय प्रवर्तक पदावरुन पायउतार; NDTV ताब्यात घेण्याचा अदानींचा मार्ग सुखकर?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: शिवाजीनगर, डेक्कनमधील वीजपुरवठा रविवारी सकाळी बंद; महापारेषणकडून पूर्वनियोजित दुरुस्ती
रविवारच्या मेगाब्लाॅकमधून मुंबईकरांची सुटका; महापरिनिर्वाणदिनानिमित्त मेगाब्लाॅक नाही
Viral Video: 114 kmph वेगानं दुचाकी चालवणाऱ्या दोन तरुणांचा मृत्यू, दुभाजकाला धडक दिल्याचा थरार कॅमेरात झाला कैद
धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा उत्तराधिकारी कोण असू शकतो? यावर सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला खुलासा
ओला, उबरच्या धर्तीवर बेस्टची टॅक्सी सेवा; पुढील सहा महिन्यांत ५०० टॅक्सी बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार