नवी दिल्ली :‘अदानी ग्रुप’चे प्रमुख गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ११५.४ अब्ज डॉलर असून त्यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि एकेकाळचे जगातील सर्वात धनाढय़ असलेल्या बिल गेट्स यांनाही मागे टाकले आहे. अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यापेक्षा त्यांची संपत्ती अधिक आहे.

‘फोर्ब्स’ने जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी नुकतीच जाहीर केली. टेस्ला आणि स्पेसएक्स या कंपन्यांचे संस्थापक एलोन मस्क हे या यादीत अव्वल स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती २३४.४ अब्ज डॉलर आहे. बर्नाड अ‍ॅर्नो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुईस व्हुताँ हे १५५.७ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दुसऱ्या तर अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बझ हे १४९.९ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

megha engineering
निवडणूक रोखे खरेदीत देशात दुसऱ्या क्रमांकावर असणारी मेघा इंजिनिअरिंग कंपनी CBI च्या रडारवर! गुन्हा दाखल
number of Pune residents spending lakhs of rupees to get attractive number for vehicle has increased
आकर्षक क्रमांकासाठी पुणेकरांचा होऊ दे लाखोंचा खर्च! जाणून घ्या सर्वांत महागडे क्रमांक…
Anant Goenka and Minister Piyush Goyal
‘तेजांकित’ तरुणच देशाचे भविष्य, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांचे प्रतिपादन; ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ विजेत्यांचे विशेष कौतुक
mukesh ambani and gautam adani
चीनच्या बीजिंगपेक्षा मुंबईत सर्वाधिक अब्जाधिश, जागतिक श्रीमंतांच्या यादीत भारताची स्थिती काय?

चौथ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांनी मुकेश अंबानीना मागे सोडले. अंबानी या यादीत १० व्या क्रमांकावर घसरले आहेत. बिल गेट्स यांची संपत्ती १०४.२ अब्ज डॉलर असून त्यांच्यापेक्षा अदानी यांची संपत्ती ११ अब्ज डॉलरने अधिक आहे.

 गेल्या दोन वर्षांत अदानी समूहाचे काही शेअर्स ६०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. यामध्ये ग्रीन एनर्जीशी संबंधित काही स्टॉक्सचाही समावेश आहे. अदानी समूहाने अवघ्या तीन वर्षांत सात विमानतळांवर आणि भारतातील सुमारे एक चतुर्थाश हवाई वाहतुकीवर नियंत्रण मिळवले आहे. अदानी समूहाकडे आता देशातील सर्वात मोठे विमानतळ ऑपरेटर, पॉवर जनरेटर आणि बिगर-राज्य क्षेत्रातील सिटी गॅस रिटेलर आहे.

संपत्ती वाढता वाढे..

या वर्षी ४ एप्रिल रोजी गौतम अदानी यांनी १०० अब्ज डॉलरचा टप्पा गाठल्याने ती जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झाले होते. तीन महिन्यांत त्यांच्या संपत्तीत १५ अब्ज डॉलरची भर पडली. २०२१मध्ये त्यांची संपत्ती केवळ ४९ अब्ज डॉलर होती. त्यानंतर त्यांच्या संपत्तीत दर आठवडय़ाला ६००० कोटी रुपयांची भर पडत गेली, असे हुरून धनाढय़ यादीचा अहवाल सांगतो.