‘क्रिमलाइन डेअरी’ २५ टक्के हिस्सा संपादित
गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेड (जीएव्हीएल) या गोदरेज समूहातील उपकंपनीने क्रिमलाइन डेअरी प्रॉडक्ट्ल लिमिटेडमध्ये (क्रिमलाइन) हिस्सा संपादित केल्याची घोषणा केली आहे. या व्यवहारामुळे गोदरेज अॅग्रोव्हेटची क्रिमलाइनध्ये ५१% मालकी झाली आहे.
भारतातील दुधाची मागणी २०१४ मधील १३.५ कोटी टनवरून २०२० पर्यंत २० कोटी टनपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. भारतीय लोकसंख्येसाठी दूध हा प्रथिन्यांचा पसंतीचा स्रोत राहणार असल्याने प्रामुख्याने मागणीमध्ये वाढ होणार आहे. देशातील दरडोई उत्पन्न जसे वाढते, तशी चीझ, बटर, दही, आईस्क्रीम, फ्लेवर्ड योगर्ट अशा मूल्यवíधत डेअरी उत्पादनांना असलेली मागणीही पारंपरिक डेअरी उत्पादनांच्या तुलनेत अधिक गतीने वाढण्याची अपेक्षा आहे. दूध संकलन करण्याची मोठी सुविधा असलेल्या डेअरी कंपन्यांना भविष्यात या वाढत्या संधींचा लाभ घेता येईल.
क्रिमलाइन ही दक्षिण भारतातील प्रमुख डेअरी कंपनी असून तेलंगण, आंध्र प्रदेश, तामिळनाडु, कर्नाटक व मध्य भारतातील नागपुर येथे लक्षणीय स्वरुपात कार्यरत आहे. दक्षिण भारतातील चारही राज्यांतील कृषी क्षेत्राशी कंपनी संबंधित आहे. ‘जसी’ या दूध नाममुद्रेमुळे कंपनीचा किरकोळ व्यवसाय सक्षम मानला जातो. कंपनी दक्षिण भारतात ‘जर्सी मिल्क पार्लर’ही चालवते. भौगोलिक कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी आणि भविष्यातील वाढीला गती देण्यासाठी क्रिमलाइनने अलीकडेच तामिळनाडू, महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश व कर्नाटक येथून संपादनाची प्रक्रिया गतीमान केली आहे.
या संपादनाविषयी गोदरेज अॅग्रोव्हेटचे व्यवस्थापकीय संचालक बलराम सिंह यादव म्हणाले, आम्ही गेली १० वष्रे क्रिमलाइनचे भागधारक आहोत आणि या कालावधीत अत्यंत यशस्वी दुग्धव्यवसाय उभा राहताना पाहिला आहे. कंपनीने भविष्यातील वाढीच्या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात केली असून जीएव्हीएल ही यातील यशस्वी नाममुद्रा विकसित करून आणि सध्याच्या उत्पादन गटात आणखी मूल्यवíधत उत्पादनांची भर घालून व्यवसायांचे मूल्य लक्षणीय वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
क्रिमलाइन डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक के. भास्कर रेड्डी म्हणाले, गोदरेज अॅग्रोव्हेट ही एक सर्वात मोठी पशुखाद्य कंपनी असून आमचा व्यवसाय विस्तारत असताना भारतीय दुग्ध व्यवसायाबरोबरचा दीर्घ सहयोग व दीर्घकालीन नाममुद्रा उभारण्यासाठीचे ज्ञान यामुळे गोदरेज अॅग्रोव्हेटमुळे आमच्या व्यवसायामध्ये मोठे मूल्य समाविष्ट होणार आहे. २०१५-१६ अखेपर्यंत १,००० कोटी रुपयांवरून अधिक विक्री करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. क्रिमलाइन येत्या तीन ते चार वर्षांत उलाढाल दुप्पट करणार आहे.