खरेदीचा जोर ओसरल्याने मौल्यवान धातू सोन्यात गेले काही दिवस सलग नरमत आले असून, तोळ्याचा भाव तर आता २६ हजारांच्याही खाली आला आहे. मंगळवारी स्टॅण्डर्ड सोने १० ग्रॅममागे १७५ रुपयांनी कमी होत २६ हजाराच्या आत, २५,९५५ पर्यंत घसरले. तर शुद्ध सोन्याचा दर २६,१०५ रुपयांवर स्थिरावला. गेल्याच आठवडय़ात सोने दराने एकाच व्यवहारात गेल्या १५ महिन्यांतील सर्वात मोठी आपटी नोंदविली होती. ३१ ऑक्टोबर रोजी सोने थेट ६२० रुपयांनी खालावले. दिवाळीदरम्यान सोन्याचा भाव २८ हजार रुपयांवर होता. सोन्याचे दर तूर्त मोठय़ा प्रमाणात घसरणार नाहीत; डिसेंबर मध्याला अथवा अखेरीस ते २४,५०० रुपयांपर्यंत येण्याची शक्यता  मोतीलाल ओस्वालचे  किशोर नरणे यांनी व्यक्त केली आहे.