scorecardresearch

Gold Monetization Scheme: घरात ठेवलेल्या सोन्यापासून करा कमाई, जाणून घ्या स्कीम

या योजनेत किमान १० ग्रॅम सोने जमा केले जाऊ शकते.

Gold Monetization Scheme: घरात ठेवलेल्या सोन्यापासून करा कमाई, जाणून घ्या स्कीम
ही महत्त्वपूर्ण स्कीम ठरू शकते (फोटो: Financial express)

सोने हा मौल्यवान धातू भारतातील सर्वात जास्त म्हत्त्वाचा मानला जातो. अनेकजण याकडे एक महत्त्वाची गुंतवणूक म्हणून बघतात. रोजच्या वापरत तरी जास्त सोनं घातलं जात नसलं तरी दागिने करून ठेवले जातात. घरात असाच ठेवलेलं सोने सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. बँकेच्या लॉकरमध्ये सोन्याची सुरक्षितता हमी असते. यासह, जमा केलेल्या सोन्यावर बँकांकडून व्याज देखील घेतले जाऊ शकते. हे सर्व गोल्ड मोनेटाइजेशन योजनेद्वारे शक्य आहे. पंजाब नॅशनल बँकेने २०१५ मध्ये सुरू केलेल्या या योजनेच्या फायद्यांबद्दल माहिती दिली आहे.

योजनेचा तपशील काय आहे?

पंजाब नॅशनल बँकेच्या मते, ग्राहक या योजनेअंतर्गत त्यांचे सोने जमा करू शकतात. यावर ग्राहकांना सुरक्षा, व्याज उत्पन्नासह अनेक फायदे मिळतील. या योजनेत किमान १० ग्रॅम सोने जमा केले जाऊ शकते.गोल्ड मोनेटाइजेशन योजनेमध्ये सोने जमा करण्यासाठी तीन पर्याय आहेत. शॉर्ट टर्म बँक डिपॉझिट (STBD) ची मुदत १-३ वर्षापर्यंत असते. त्याच वेळी, मध्यम मुदतीचा आणि दीर्घ मुदतीच्या ठेवींचा कालावधी अनुक्रमे ५-७ वर्षे आणि १२-१५ वर्षे असतो.

किती फायदा होणार?

गोल्ड मोनेटाइझेशन स्कीम अंतर्गत व्याजाबद्दल बोलायचे झाल्यास, अल्प मुदतीच्या ठेवी ०.५० टक्क्यांपासून ते ०.७५ टक्के प्रतिवर्ष आहेत. २.५०% व्याज दीर्घ मुदतीच्या ठेवींवर आणि २.२५% मध्यम मुदतीच्या ठेवींवर उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत, बँका सोन्याचे बार, नाणी, दागिने (स्टोन्स आणि इतर धातूंशिवाय) स्वीकारतील. त्याचबरोबर ग्राहकांना अर्ज, आयडी प्रूफ, अॅड्रेस प्रूफ आणि गुंतवणूक फॉर्म भरावा लागेल.

तुम्हाला काय वाटत या स्कीमबद्दल?

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या