काय आहे आजचा सोने-चांदीचा भाव?; जाणून घ्या | Loksatta

काय आहे आजचा सोने-चांदीचा भाव?; जाणून घ्या

सोने-चांदी सारख्या धातूच्या किंमतीमध्ये सातत्याने बदल दिसून येत असतो. या बदलामागे अनेक कारणंं असतात.

काय आहे आजचा सोने-चांदीचा भाव?; जाणून घ्या
आजचा सोने चांदीचा भाव (प्रातिनिधिक फोटो)

सोने चांदीच्या भावात सातत्याने बदल दिसून येत असतो. राज्यानुसारही किंमतीमध्ये बऱ्यापैकी फरक जाणवतो. गेल्या काही दिवसापासून गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६३,३०० रुपये प्रति किलोने विकली जात होती ज्याचा भाव आता ३०० रुपयांनी खाली गेला आहे. गुड रिटर्न्स या वेबसाईटच्या मते, संपूर्ण देशभरात सोने दागिन्यांची किंमत बदलते कारण उत्पादन शुल्क, राज्य कर आणि शुल्क आकारणी यांच्यात बदल असतो.

काय आहे आजचा भाव?

नवी दिल्लीमध्ये, किंमत १०,५००० प्रति ४५,५०० रुपये आहे. मुंबईसाठी, पिवळा धातू अर्थात सोने ४५,२८०  रुपयांना विकले जात आहे, तर चेन्नईमध्ये ती ४३,७३० रुपयांवर आहे.नवी दिल्लीमध्ये  किंमत ४९,६००  रुपये प्रति १०  ग्रॅम (२४ कॅरेट) आहे, तर मुंबईत ती ४६,२८० अशी किंमत आहे. पुण्यामध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४,६२० रुपये आहे तर २४ कॅरेटचा ४७,७०० रुपये इतका आहे.

सोन्याची शुद्धता अशी ओळखावी

२४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो.  ज्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. जर तुम्ही २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

जर २२ कॅरेटचे दागिने असतील तर त्यात ९१६,२१ कॅरेट दागिन्यांवर ८७५ आणि १८ कॅरेट दागिन्यांवर ७५० असे लिहिले असायला हवं. दुसरीकडे, जर दागिने १४ कॅरेटचे असतील तर त्यामध्ये ५८५ लिहिले दिसून येईल. दागिन्यांमध्येच तुम्ही हे हॉलमार्क पाहू शकता.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-08-2021 at 11:18 IST
Next Story
आता एटीएममध्ये पैसे नसल्यास बँकांना आकारला जाणार दंड; RBI चा मोठा निर्णय