scorecardresearch

सोने-चांदीच्या भावामध्ये बदल; जाणून घ्या आजचा दर

ऑगस्टमध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण बघायला मिळाली आहे. सोने चांदी खरेदीसाठी ही उत्तम वेळ असू शकते.

Gold Rate Today on 19 August 2021
आजचा सोने चांदीचा दर (फोटो: Financial Express)

२२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमच्या किंमती गुरुवारी ७० रुपयांनी वाढून ४६,५०० रुपयांवर पोहोचल्या, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमत सुधारली गेली आहे अशी प्रतिक्रिया आहे. यापूर्वीच्या ट्रेडमध्ये सोने प्रति १० ग्रॅम ४६,१६० रुपये किंमतीवर बंद झाले होते.गुड रिटर्न्स या संकेतस्थळाच्या मते, चांदी ९०० रुपयांनी वाढून ६३,६०० रुपये प्रति किलोवर विकली जात होती.उत्पादन शुल्क, राज्य कर आणि शुल्क आकारणीमुळे संपूर्ण भारतामध्ये सोन्याचे दागिने, धातूचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक यामुळे किंमतीमध्ये बदल दिसून येतो.

काय आहे आजचा सोन्याचा भाव?

गुड रिटर्नस या वेबसाईट नुसार, २२ कॅरेटच्या १० ग्रॅमसाठी मुंबईत सोन्याचा ४६,५०० रुपये आहे. पुण्यात सोन्याची किंमत २२ कॅरेटच्या १० ग्रॅम प्रति ४५,५९० रुपये आहे. नागपुरात सोन्याचा दर २२ कॅरेटच्या १० ग्रॅमसाठी ४६,५०० रुपये आहे. तर २४ कॅरेटच्या १० ग्रॅमसाठी मुंबईत सोन्याचा ४७,५१० रुपये आहे. पुण्यात सोन्याची किंमत २४ कॅरेटच्या १० ग्रॅम प्रति ४८,८२० रुपये आहे. . नागपुरात सोन्याचा दर २४ कॅरेटच्या १० ग्रॅमसाठी ४७,५१० रुपये आहे.

चांदीचा भाव

चांदीचा भाव आज प्रती १० ग्रॅम कालच्या किंमती पेक्षा १० रुपयाने कमी झाला आहे. ६२५ रुपये इतका १० ग्रॅमचा दर आहे. (वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता अशी ओळखावी

२४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. जर तुम्ही २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-08-2021 at 12:00 IST