आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४५,६८० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४५,४९० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६१,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे आजचा भाव?

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,६८० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४६,६८० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४४,८५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,६८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,६८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,६८० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६०६ रुपये आहे. कालच्या आणि आजच्या दरामध्ये काहीच फरक नाही.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold rate price today on 7 october 2021 forecast outlook silver price rate today ttg
First published on: 07-10-2021 at 09:34 IST