सोन्याचे भाव दररोज कमी जास्त होताना दिसतात. यामागे वेगवेगळी कारणं असतात. गेल्या वर्षीपासून सुरु असलेल्या कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सोनाच्या आणि चांदीच्या भावामध्ये उच्चांक आणि नीचांक दोन्ही बघायला मिळाले. २२ ग्रॅम कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत आज २९० रुपयांनी घसरून ४६,११० रुपये झाली. मागील ट्रेडमध्ये, मौल्यवान धातूची किंमत ४६,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६३,९०० रुपये प्रति किलोने विकली जाईल. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे संपूर्ण भारतात सोन्याच्या दागिने किंमतीमध्ये बदल दिसून येतो.

सोन्याचा काय आहे आजचा दर?

२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ४७,११० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४७,११० रुपये झाला आहे तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४६,११० एवढा झाला आहे. पुण्यामध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,८४० प्रति १० ग्रॅम आहे तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४५,३९० रुपये इतका आहे. सोन्याच्या बाजारपेठेतलं आणखीन एक महत्त्वाच शहर म्हणजे नागपूर. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४७,११० रुपये आहे आणि २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४६,११० रुपये एवढा आहे. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४८,८४० आहे व २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४५,३९० रुपये एवढा आहे.

nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?

चांदीचा आजचा दर

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत चांदीचे दर कमी आहेत. २००८ नंतर चांदीचे दर वाढले. तथापि, गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्यात काही खास बदल झालेच नाहीत. २०१८ मध्ये, मुंबईत सोन्या -चांदीच्या किंमतींमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली कारण गुंतवणूकदारांनी शेअर्स विकले आणि सोने आणि चांदी खरेदी केले. गुडरिटर्नस या वेबसाईटनुसार आजचा मुंबईतील चांदीचा दर १० ग्रॅमसाठी ६३९ रुपये आहे. पुण्यासाठी १० ग्रॅमसाठी दर ६३९ रुपये असा आहे. नागपूर आणि नाशिकमध्येही चांदीचा दर हा १० ग्रॅमसाठी ६३९ रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)