Gold-Silver Price on Monday, 26 September 2022 In Maharashtra. | Loksatta

Gold-Silver Price on 26 September 2022: आज सोने-चांदीचे दर स्वस्त की महाग? जाणून घ्या

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Gold-Silver Price on 26 September 2022: आज सोने-चांदीचे दर स्वस्त की महाग? जाणून घ्या
संग्रहित छायाचित्र

Gold- Silver Price Today : आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४६,५०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,००० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ५६,३०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ५६,३०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,५०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,२०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,०३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,२३० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,०३० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,२३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,०३० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,२३० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५६३ रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

विश्लेषण : सोन्याची किंमत ठरते कशी? नेमके कोणते घटक ठरतात कारणीभूत? जाणून घ्या सविस्तर!

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Gold-Silver Price on 25 September 2022: सोने-चांदीच्या किमतीमध्ये आजही अंशतः घट; जाणून घ्या नवे दर

संबंधित बातम्या

छोटय़ा गुंतवणूकदारांची ओढ समभागांकडे!
सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; जाणून घ्या आजचा १० ग्रॅमचा भाव
NDTV-Adani Deal: प्रणॉय रॉय, राधिका रॉय प्रवर्तक पदावरुन पायउतार; NDTV ताब्यात घेण्याचा अदानींचा मार्ग सुखकर?
‘टोयोटा-किर्लोस्कर मोटर’च्या विक्रम किर्लोस्कर यांचं निधन; ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Gold-Silver Price on 1 December 2022: डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदीची किंमत काय? जाणून घ्या

व्हिडिओ

ताज्या बातम्या
बांगलादेशी आणि रोहिंग्यांबद्दलचं वक्तव्य परेश रावल यांना पडलं महागात; माफी मागूनही तक्रार दाखल
शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्प; सर्वात मोठ्या पाईल कॅपच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण
FIFA World Cup 2022: आजपासून सुपर-१६ लढतींचा थरार, पाहा सर्व सामन्यांचे वेळापत्रक
रणवीर सिंगने सर्वांसमोर सिद्धार्थ जाधवला धक्का दिला अन्… पुढे काय घडलं? पाहा व्हिडीओ
“सोलापुरात कर्नाटक भवन बांधणार असाल, तर आम्हाला…”, संजय राऊतांचे मुख्यमंत्री बोम्मईंना प्रत्युत्तर