Gold-Silver Price on Wednesday, 5 October 2022 In Maharashtra. | Loksatta

Gold-Silver Price on 5 October 2022: दसऱ्याच्या दिवशी सोने-चांदीच्या दरात कमालीची वाढ; जाणून घ्या, आजची किंमत

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Gold-Silver Price on 5 October 2022: दसऱ्याच्या दिवशी सोने-चांदीच्या दरात कमालीची वाढ; जाणून घ्या, आजची किंमत
आजचा सोने-चांदीचा दर काय?

Gold- Silver Price Today : आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४७,३५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,८५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६१,८०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ५७,४०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,३५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,६६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,३८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,६९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,३८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,६९० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,३८० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,६९० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६१८ रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

विश्लेषण : सोन्याची किंमत ठरते कशी? नेमके कोणते घटक ठरतात कारणीभूत? जाणून घ्या सविस्तर!

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
जागतिक सकारात्मकतेने आतषबाजी ; सेन्सेक्सची १,२७७ अंशांची मुसंडी

संबंधित बातम्या

गच्छंती आवश्यकच होती – रतन टाटा
RBI Monetary Policy: सलग १०व्यांदा व्याजदर जैसे थे; रिझव्‍‌र्ह बँकेकडून रेपो दर ४ टक्के कायम
Gold-Silver Price on 29 August 2022: आज सोने-चांदीचे दर स्थिर; जाणून घ्या किंमत
बँक खासगीकरणाचा धडाका नको – डी. सुब्बाराव
Gold-Silver Price on 21 September 2022: सोनं झालं महाग, तर चांदीची चमकही वाढली; जाणून घ्या आजचा दर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
रिक्षा चालकाच्या बाजूला बसून मराठमोळ्या अभिनेत्रीचा प्रवास; पोस्ट शेअर करत म्हणाली “आपली चौकट…”
David Warner Leadership Ban: “त्याला बळीचा बकरा बनवण्यात आले “, माजी खेळाडू मायकेल क्लार्कचे वक्तव्य
Video : “‘बिग बॉस’ मला घरी जायचं आहे, इथून बाहेर काढा” टीना दत्ता ढसाढसा रडू लागली, कारण…
बिग बी शाहरुखनंतर मादाम तुसाँमध्ये ‘या’ अभिनेत्याला मिळाले स्थान; बॉलिवूडमध्ये होतंय कौतुक
विश्लेषण: गुजरातमध्ये फक्त चंचुप्रवेश करूनही ‘आप’ ठरला ‘राष्ट्रीय पक्ष’, कुठल्या निकषांची केली पूर्तता?