Gold-Silver Price on Saturday, 1 October 2022 In Maharashtra. | Loksatta

Gold-Silver Price on 1 October 2022: महिन्याच्या सुरुवातीलाच सोने-चांदीच्या दरांमध्ये वाढ; जाणून घ्या आजची किंमत

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Gold-Silver Price on 1 October 2022: महिन्याच्या सुरुवातीलाच सोने-चांदीच्या दरांमध्ये वाढ; जाणून घ्या आजची किंमत
आजचा सोने-चांदीचा भाव (फोटो: Financial Express)

Gold- Silver Price Today : आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४६,६५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ५६,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ५७,००० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,६५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,९०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,६८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,९३० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,६८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,९३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,६८० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,९३० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५६९ रुपये आहे.

Petrol-Diesel Price on 1 October 2022: ग्राहकांसाठी खुशखबर! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सातत्याने घसरण

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

विश्लेषण : सोन्याची किंमत ठरते कशी? नेमके कोणते घटक ठरतात कारणीभूत? जाणून घ्या सविस्तर!

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सीएनजी, पीएनजी, खते महागणार!; नैसर्गिक वायूंच्या किमतीत थेट ४० टक्के वाढ

संबंधित बातम्या

Gold-Silver Rate Today: आठवड्याच्या शेवटी सोन्या-चांदीचे भाव वाढले, जाणून घ्या आजचा दर
Gold-Silver Rate Today: सोन्याचा भाव ४८ हजाराहून अधिक, चांदीही महागली; रशिया-युक्रेनमधील युद्धाचा परिणाम
PM Yojna: ‘या’ योजनेअंतर्गत मिळवा मोफत शिलाई मशीन! एक रुपयाही खर्च करायची गरज नाही
Gold-Silver Price on 27 July 2022: जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव
भांडवली बाजारातून सरकारची निधी उभारणी ; चार महामार्ग प्रकल्पांसाठी ‘इन्व्हिट्स’ विक्री

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Video : भिंतीचा आधार घेत पार्टीतून बाहेर पडली सोहेल खानची पूर्वाश्रमीची पत्नी; नेटकरी म्हणाले, “धड चालताही…”
पैशांचा अपहार झालाय? चिंता करू नका, Cyber Fraud झाल्यावर या नंबरवर कॉल करा अन् पैसै वाचवा
“…तेव्हा तेव्हा विक्रमकाका तुमची उणीव भासत राहील” अमोल कोल्हे हळहळले
‘Squid Game’ या लोकप्रिय वेबसीरिजमधील अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप; पाच वर्षांपूर्वी घडलेला प्रकार आला समोर
“गुवाहाटीला जाण्यासाठी शिंदे गटाकडे पैसे कुठून आले?” चार्टर्ड विमानाच्या प्रवासावरून प्रश्नचिन्ह उपस्थित, चौकशीची मागणी