scorecardresearch

Gold-Silver Rate Today : सोने-चांदीच्या भावात सातत्याने घसरण; जाणून घ्या आजचा भाव

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात.

Gold-Silver Rate Today : सोने-चांदीच्या भावात सातत्याने घसरण; जाणून घ्या आजचा भाव
आजचा सोने-चांदीचा भाव (फोटो: Financial Express)

सोन्याच्या किमतीमध्ये मागील काही दिवसात चढ-उतार सुरु आहे. भारतीय सराफा बाजारात, जिथे २४ फेब्रुवारी रोजी सोन्याच्या किमतीत जोरदार झेप घेतली गेली, तिथे शुक्रवारी भारतातील सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळाली. आज २६ फेब्रुवारीला १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ४६,८४० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,८५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६४,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

काय आहे आजचा भाव?

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,८४० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दरही कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,१०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,८९० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,१९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,९७० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,२४० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६४० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-02-2022 at 09:53 IST

संबंधित बातम्या