Gold- Silver Price Today : कालच्या तुलनेत आज सोनेच्या दरामध्ये कोणताच बदल झाला नसून चांदीच्या दरामध्ये किंचत घट झाली आहे. कालप्रमाणेच आजही २२ कॅरेट सोन्याची किंमत ४८,१५० प्रति १० ग्रॅम आहे. तर गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदीचे दर २० पैशांनी पडले आहेत. ५९,३०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८,१५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,५३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,१८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,५८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,१८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,५८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,१८० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,५८० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५९३ रुपये आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold silver prices maharashtra on sunday 14 august 2022 in mumbai pune nagpur nashik pvp
First published on: 14-08-2022 at 09:33 IST