Gold- Silver Price Today : कालच्या तुलनेत आज सोने चांदीच्या दराच किंचत घट झाली असून आज २२ कॅरेट सोन्याची किंमत ४६,३१० प्रति १० ग्रॅम आहे. तर गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ५५,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,२०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,५२० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,३९० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,६१० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,३९० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,६१० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,३९० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,६१० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५५९ रुपये आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold silver prices today in maharashtra mumbai pune nagpur nashik wednesday 20 july 2022 know the news rates pvp
First published on: 20-07-2022 at 09:54 IST