Premium

Gold- Silver Price Today: सोने-चांदी खरेदीची उत्तम वेळ! आजही दर स्थिर

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. जाणून घ्या आजचा भाव.

gold silver rate
आजचा सोने-चांदीचा भाव (फोटो: Financial Express)

Gold- Silver Price Today : आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४६,२५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,४५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ५९,४०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे आजचा भाव?

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,२५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,४५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,३२० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,५२० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,३२० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,५२० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,३२० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,५२० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५९४ रुपये आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-05-2022 at 08:58 IST
Next Story
एप्रिलमध्ये नवीन ८८ लाख रोजगार संधी – सीएमआयई