आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूंच्या किमतीत आज पुन्हा घसरण झाली असून १० ग्राम २२ कॅरेट सोन्याची किंमत ४५,५०० रुपये झाली आहे. मागील ट्रेडमध्ये या या मौल्यवान धातूची किंमत ४५,९०० रुपये प्रति ग्रॅमवर बंद झाली. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६३,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

काय आहे आजचा भाव?

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,५०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,६४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,५०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,६५० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,५०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,४५० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६३२ रुपये आहे.

Gold Silver Price on 19 April 2024
Gold-Silver Price on 19 April 2024: सोन्याच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्याचं बजेट बिघडवलं, जाणून घ्या १० ग्रॅमचा दर
Gold Silver Price on 12 April 2024
Gold-Silver Price on 13 April 2024: सोन्याचा भाव ऐकून बाजारात उडाली खळबळ; जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याची किंमत
Gold Silver Price on 6 April 2024
Gold-Silver Price on 6 April 2024: सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक वाढ; चांदीनेही गाठला सार्वकालिक उच्चांक, पाहा आजचा भाव
Gold Silver Price on 29 March 2024
Gold-Silver Price on 29 March 2024: सोन्याच्या भावाने गाठला विक्रमी उच्चांक; चांदीही ७५ हजारांच्या पार, पाहा नवे दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

भारतात हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो?

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

सोन्याची शुद्धता अशी ओळखावी?

२४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. जर तुम्ही २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.