आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४८,४०० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,७०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ७०,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

काय आहे आजचा भाव?

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८,४०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,८०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,४५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,८५० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,५०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,९०० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७०० रुपये आहे.

Gold Silver Price on 15 April 2024
Gold-Silver Price on 15 April 2024: सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांना फुटला घाम, १० ग्रॅमचा दर ऐकून व्हाल थक्क
Gold Silver Price on 6 April 2024
Gold-Silver Price on 6 April 2024: सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक वाढ; चांदीनेही गाठला सार्वकालिक उच्चांक, पाहा आजचा भाव
Gold Silver Price on 27 March
Gold-Silver Price on 27 March 2024: सोन्याच्या किमतीमध्ये वाढ सुरुच, तर चांदीची चकाकी उतरली, पाहा आजचे दर
Gold Silver Price on 22 March
Gold-Silver Price on 22 March 2024: विक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी सोन्या-चांदीचे दर थंडावले, १० ग्रॅमची किंमत आता…

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

भारतात हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो?

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

सोन्याची शुद्धता अशी ओळखावी

२४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. जर तुम्ही २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.