दोन दिवसात सोनं तब्बल १६०० रुपयांनी घसरलं

दोन दिवसापासून सोन्याचे भाव कमी झाले आहेत. हे भाव म्हणजे गेल्या ४ महिन्यांमधला सर्वात नीचांक आहे.

gold rates goes down
सोन्याच्या भावात घसरण (फोटो: financial express)

सोन्याचे भाव दररोज कमी जास्त होताना दिसतात. यामागे वेगवेगळी कारणं असतात. गेल्या वर्षीपासून सुरु असलेल्या कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सोनाच्या आणि चांदीच्या भावामध्ये उच्चांक आणि नीचांक दोन्ही बघायला मिळाले. गेल्या दोन दिवसात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम म्हणजेच तोळ्यामागे तब्बल १६०० रुपयांनी घसरला असून सध्या सोन्याचा भाव चार महिन्यांच्या नीचाकांवर आहे. मल्टि कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) गोल्ड फ्युचर्सचा भाव प्रति १० ग्रॅमला ४६ हजार २९ रुपये असून हा चार महिन्यांमधला नीचांक आहे.

जागतिक बाजारपेठेत, सोन्याचे दर आज ४.४ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे अमेरिकेची फेडरल रिझर्व अपेक्षेपेक्षा वेगाने दर वाढेल या भीतीने ही घसरण झालीय. रोजगाराच्या संधी वाढल्याची आकडेवारी समोर आल्यानंतरही ही उलाढाल असल्याचं सांगितलं जात आहे. सत्राच्या सुरुवातीला १,६८४.३७ डॉलर्सपर्यंत गेल्यावर सोन्याचा दर २.३% घसरून १,७२२.०६ डॉलर प्रति औंस असा झाला. सत्राच्या सुरुवातीला ७.५% इतकी घसरण झाल्यानंतर चांदी २.६ % खाली २३.७० डॉलरवर आली. “जेव्हा किंमत १,७८८ डॉलर्सच्या खाली राहते तेव्हा सोन्याच्या भावाची घसरण चालू राहण्याची शक्यता असते. पुढील १,६६५ डॉलर्सची थेट घसरण म्हणजे अल्पकालीन मंदीचे संकेत आहेत. त्याचप्रमाणे, काउंटरमध्ये रिकव्हरी रॅली ट्रिगर करण्यासाठी १,८३५ डॉलर्स च्या वर जाणे आवश्यक आहे,”  असं डोमॅस्टिक ब्रोकर जिओजितने एका पत्रकामध्ये म्हटले आहे.

शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले की, अमेरिकन कंपन्यांनी जुलैमध्ये जवळजवळ एका वर्षात सर्वाधिक कामगार नियुक्त केले आणि वेतन वाढवले. या आकडेवारीमुळे डॉलर आणि बेंचमार्क यूएसला चालना दिली. कोमेक्सवर चांदीचे दर घसरल्याचं पहायला मिळालं. आठवड्याभरात चांदीचे दर ४.५५% घसरून २४.३३ डॉलर प्रति औंस झाले. एमसीएक्स चांदी सप्टेंबरमध्ये घसरण ४.२०% कमी होऊन ६५,००० रुपये प्रति किलो होईल. करोना संसर्गाच्या वाढत्या चिंतेमुळे कमकुवत मागणीच्या दृष्टिकोनातून मजबूत डॉलर आणि बेस मेटल्सच्या विक्रीवर चांदीचे भाव घसरलेत. मनी व्यवस्थापकांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या नेट लॉंग पोझिशनमध्ये ४७०९ लॉटने वाढ केल्याचं सीएफटीसीच्या आकडेवारीवरून दिसून आलं,

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Gold sliver prices crash today in last 2 days gold fell by rs 1600 ttg