अल्पबचत योजनांच्या व्याज दराला कात्री

बाजाराशी सुसंगत तिमाही व्याज दर निश्चित करताना सरकारने नवे दर जुलै ते सप्टेंबरकरिता लागू केले आहेत.

small savings schemes
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, किसान विकास पत्र, सुकन्या समृद्धी योजना आदींवरील व्याज दर सरकारने ०.१० टक्क्याने कमी केले आहेत.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, किसान विकास पत्र, सुकन्या समृद्धी योजना आदींवरील व्याज दर सरकारने ०.१० टक्क्याने कमी केले आहेत.

बाजाराशी सुसंगत तिमाही व्याज दर निश्चित करताना सरकारने नवे दर जुलै ते सप्टेंबरकरिता लागू केले आहेत. यानुसार सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर ७.८ टक्के, ११५ महिन्यांच्या मुदतीच्या किसान विकास पत्रावर ७.५ टक्के तर लहान मुलींची बचत योजना असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेवर ८.३ टक्के वार्षिक व्याज दर लागू होईल.

मात्र बचत ठेवींवरील व्याज दर तूर्त वार्षिक ४ टक्के असे कायम राहणार आहेत. एप्रिल २०१६ पासून सर्व प्रकारच्या अल्प बचत ठेव योजनांवरील व्याज दरही बदलत होते.

ज्येष्ठ नागरिकांच्या पाच वर्षे मुदतीच्या बचत योजनांवर ८.३ टक्के दर असेल. १ ते ५ वर्षे मुदतीच्या ठेवींवर ६.८ ते ७.६ टक्के व्याज दर असेल. तर पाच वर्षे मुदतीच्या ठेवींवर ७.१ टक्के दर लागू होईल.

२०१७-१८ या चालू आर्थिक वर्षांतील दुसऱ्या तिमाहीसाठीच्या व्याज दर फेरबदलाची अधिसूचना सरकारने शुक्रवारी काढली. यामुळे आता बँकांच्या ठेवी दरांतही बदल होण्याची शक्यता वर्तविली आहे.

जून ते सप्टेंबर तिमाहीसाठी सुधारीत व्याजदर

विद्यमान         सुधारीत

बँक/पोस्टाचे बचत खाते                              ४%                ४%

सुकन्या समृद्धी योजना                               ८.४%             ८.३%

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी                 ७.९%            ७.८%

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे                               ७.९%           ७.८%

(५ वर्षे मुदतीची)

मुदतीच्या ठेवी                                          ६.९-७.७%     ६.८-७.१%

ज्येष्ठ नागरिक ठेव योजना                      ८.४%             ८.३%

मासिक उत्पन्न खाते                                ७.६%             ७.५%

किसान विकास पत्र                                   ७.६%             ७.५%

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Government cut interest rate on small savings schemes

ताज्या बातम्या