scorecardresearch

अर्थसंकल्पापूर्वी चांगली बातमी; जानेवारीत विक्रमी १.३८ लाख कोटींचे GST संकलन

येत्या काही महिन्यांत जीएसटी संकलनातील वाढीचा हा टप्पा कायम राहील, अशी आशा सरकारने व्यक्त केली आहे

GST collection January 2022 crossed mark for the 4th time
(फोटो सौजन्य -PTI)

देशाच्या अर्थसंकल्पापूर्वी जीएसटी संकलनाच्या बाबतीत देशाला आनंदाची बातमी मिळाली आहे. जानेवारी महिन्यात १.३८ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या जानेवारीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी अधिक आहे. सलग चौथ्या महिन्यात जीएसटी संकलन १.३० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. एप्रिल २०२१ मध्ये आतापर्यंतचे सर्वोच्च जीएसटी संकलन १.३९ लाख कोटी रुपये होते. वित्त मंत्रालयाच्या निवेदनात, डिसेंबर २०२१ मध्ये देशभरात एकूण ६.७ कोटी ई-वे बिले तयार झाली. नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत हा आकडा १४ टक्क्यांनी अधिक आहे. नोव्हेंबरमध्ये एकूण ५.८ कोटी ई-वे बिले तयार झाली.

येत्या काही महिन्यांत जीएसटी संकलनातील वाढीचा हा टप्पा कायम राहील, अशी आशा सरकारने व्यक्त केली आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम न झाल्याने आणि आता उताराकडे जात असल्याने अर्थव्यवस्थेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. देशात सणासुदीचा हंगामही चांगला गेला असून आता सरकारने नव्या वर्षात ७.५ टक्के आर्थिक विकासाचा अंदाज व्यक्त केला आहे. असे झाले तर अर्थव्यवस्थेसाठी ही चांगली बातमी असेल. जीएसटी संकलनाव्यतिरिक्त, इतर काही निर्देशक आहेत जे सूचित करतात की येत्या काही महिन्यांत अर्थव्यवस्था वेगवान होईल.

जानेवारीमध्ये जीएसटी संकलनात सीजीएसटीचा हिस्सा २४,६७४ कोटी रुपये आहे. याशिवाय राज्य जीएसटी म्हणून सरकारला ३२,०१६ कोटी रुपये मिळाले आहेत. त्याच वेळी, आयजीएसटी म्हणून एकूण ७२,०३० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याआधी जीएसटी संकलनाची ही बातमी उत्साहवर्धक आहे. यावेळी अर्थमंत्र्यांकडून काही मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात, असे मानले जात आहे. विशेषतः करमुक्ती, आरोग्य सुविधांचे बजेट वाढवणे असे निर्णय होऊ शकतात.

दरम्यान, अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स ६५० हून अधिक अंकांच्या वाढीसह ५८,७०० अंकांच्या जवळ व्यवहार करत होता. निफ्टीनेही १७,५०० चा टप्पा ओलांडला आहे. १९ ऑक्टोबर २०२१ रोजी सेन्सेक्स ६२२४५.४३ अंकांच्या पातळीवर गेला होता. ही आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. त्यानंतरच्या व्यापारात बहुतेक वेळा विक्रीचे वर्चस्व होते.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gst collection january 2022 crossed mark for the 4th time abn

ताज्या बातम्या