नवी दिल्ली : वस्तू व सेवा कर संकलन जानेवारीत १.३८ लाख कोटींपलीकडे गेले. यापूर्वीच्या वर्षीपेक्षा ही वाढ १५ टक्क्यांनी अधिक आहे.

चालू महिन्याच्या, ३० जानेवारी २०२२ पर्यंत दाखल करण्यात आलेली जीएसटीआर-३बी रिटर्न्‍सची एकूण संख्या १.०५ कोटी असून, यात ३६ लाख तिमाही रिटर्न्‍सचा समावेश आहे, असे अर्थमंत्रालयाने सांगितले. जानेवारी या सलग चौथ्या महिन्यात जीएसटी संकलनाची रक्कम १.३० लाख कोटींहून अधिक झाली आहे.

वस्तू व सेवा कर संकलनाची सर्वाधिक मासिक रककम एप्रिल २०२१ मध्ये १,३९,७०८ कोटी रुपये इतकी होती.

जानेवारी २०२२ मध्ये गोळा झालेला महसूल गेल्या वर्षी याच महिन्यात गोळा झालेल्या महसुलापेक्षा १५ टक्के अधिक, तर जानेवारी २०२० मधील जीएसटी महसुलापेक्षा २५ टक्के अधिक आहे.