मुंबई : देशातील वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलनाने चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्याच एप्रिल महिन्यात नवा विक्रम करत प्रथमच दीड लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. एप्रिल २०२२ मध्ये देशभरात एकूण १ लाख ६७ हजार ५४० कोटी रुपयांचा महसूल जीएसटीच्या माध्यमातून गोळा झाला आहे. महाराष्ट्रानेही २७ हजार ४९५ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन करत त्यात मोलाचे योगदान दिले आहे.

देशात एप्रिल २०२२ मध्ये १ लाख ६७ हजार ५४० कोटींचे जीएसटी संकलन झाले. त्यात केंद्रीय जीएसटी ३३ हजार १५९ कोटी रुपये, राज्य जीएसटी ४१ हजार ७९३ कोटी रुपये तर एकात्मिक जीएसटी ८१ हजार ९३९ कोटी रुपये तर अधिभार १० हजार ६४९ कोटी रुपये यांचा समावेश आहे. आतापर्यंतचे हे विक्रमी जीएसटी संकलन असून मार्च २०२२ मध्ये १ लाख ४२ हजार ९५ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. त्यामुळे मागील महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये जीएसटी संकलनात तब्बल २५ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याशी तुलना करता यंदा जीएसटी महसुलात २० टक्के वाढ झाली आहे.

Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही
Sensex Hits Record, High, 75 thousands Points, Nifty Touches 22753 Points, sensex nifty high, share market, stock market, finance, finance knowledge, finance article, share market high, stoke markte high, marathi news,
सेन्सेक्स प्रथमच ७५ हजारांवर विराजमान
maharashtra gst collection more than three lakh crore in march 2024
राज्यात ‘जीएसटी’पोटी वर्षभरात तीन लाख कोटींहून अधिक संकलन
maharashtra registered a record revenue collection from registration and stamp duty
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने केला विक्रम

देशातील या विक्रमी जीएसटी संकलनात सर्वाधिक २७ हजार ४९५ कोटी रुपयांचे योगदान महाराष्ट्राने दिले आहे. त्यानंतर कर्नाटक ११ हजार ८२० कोटी रुपये, गुजरात ११ हजार २६४ कोटी रुपये, तामिळनाडू ९,७२४ कोटी रुपये, उत्तर प्रदेश ८,५३४ कोटी रुपये, हरयाणा ८,१९७ कोटी रुपये, दिल्ली ५,८७१ कोटी रुपये, पश्चिम बंगाल ५,६४४ कोटी रुपये आदींचा प्रामुख्याने समावेश आहे. महाराष्ट्रातील जीएसटी संकलन एप्रिल २०२१ मध्ये २२ हजार १३ कोटी रुपये होते. यंदा एप्रिल २०२२ मध्ये ते २७ हजार ४९५ कोटी रुपयांवर गेले आहे. ही मागील वर्षांच्या एप्रिलच्या तुलनेत २५ टक्के वाढ आहे.