मुंबई : देशातील वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलनाने चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्याच एप्रिल महिन्यात नवा विक्रम करत प्रथमच दीड लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. एप्रिल २०२२ मध्ये देशभरात एकूण १ लाख ६७ हजार ५४० कोटी रुपयांचा महसूल जीएसटीच्या माध्यमातून गोळा झाला आहे. महाराष्ट्रानेही २७ हजार ४९५ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन करत त्यात मोलाचे योगदान दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात एप्रिल २०२२ मध्ये १ लाख ६७ हजार ५४० कोटींचे जीएसटी संकलन झाले. त्यात केंद्रीय जीएसटी ३३ हजार १५९ कोटी रुपये, राज्य जीएसटी ४१ हजार ७९३ कोटी रुपये तर एकात्मिक जीएसटी ८१ हजार ९३९ कोटी रुपये तर अधिभार १० हजार ६४९ कोटी रुपये यांचा समावेश आहे. आतापर्यंतचे हे विक्रमी जीएसटी संकलन असून मार्च २०२२ मध्ये १ लाख ४२ हजार ९५ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. त्यामुळे मागील महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये जीएसटी संकलनात तब्बल २५ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याशी तुलना करता यंदा जीएसटी महसुलात २० टक्के वाढ झाली आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gst collection touches record high in april 2022 zws
First published on: 02-05-2022 at 01:56 IST