प्रतिस्पर्धी बँकांची बरोबरी साधताना एचडीएफसीनेही महिला कर्जदारांसाठी वार्षिक ९.८५ टक्के सवलतीचा गृह कर्ज व्याज दर देऊ केला आहे.
स्टेट बँक व आयसीआयसीआय बँकेचा हाच दर महिला वर्गासाठी यापूर्वीच लागू झाला आहे, तर एचडीएफसीचाही अन्य कर्जदारांसाठीचा व्याज दर ९.९० टक्के आहे.
महिला सशक्तीकरणासाठीचे उत्पादन सादर करताना महिलांच्या घरमालकीला प्रोत्साहन देण्यासाठी सवलतीचा ९.८५ टक्के दर लागू करत असल्याचे एचडीएफसीच्या व्यवस्थापकीय संचालक रेणू सूद कर्नाड यांनी म्हटले आहे.
एप्रिलच्या सुरुवातीला रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्थिर पतधोरणानंतर बँकांनी त्यांचे आधार दर कमी करीत गृह कर्ज व्याज दरही ०.२० टक्क्यांपर्यंत कमी केले होते. यामुळे अनेक बँकांचे वार्षिक गृह कर्ज व्याज दर तूर्त १० टक्क्यांखाली आले आहेत.
महिला वर्गासाठी भिन्न व सवलतीचा गृह कर्ज व्याज दर लागू करण्याची सुरुवात सर्वप्रथम स्टेट बँकेने दोन वर्षांपूर्वी केली होती. बँकेने ही भूमिका यंदाही कायम राखली, तर आयसीआयसीआय बँकेने यंदा प्रथमच महिलांसाठीच्या सवलतीचे व्याज दर लागू केले. आता एचडीएफसीही या स्पर्धेत सहभागी झाली आहे.

shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…