शहरी जीवनातून अस्तंगत होत चाललेल्या ‘फॅमिली डॉक्टर’ संकल्पनेची कम्युनिटी मेडिकल सेंटरद्वारे नव्याने रुजुवात करणाऱ्या ‘हेल्थस्प्रिंग’ने सध्या कार्यरत चार वैद्यक केंद्रांमध्ये नुकतीच चार नव्या केंद्रांची भर घातली आहे. नवीन केंद्रे पवई (हिरानंदानी गार्डन्स), वाशी (सेक्टर-१), ठाणे (घोडबंदर रोड) आणि अंधेरी पश्चिम न्यू लिंक रोड येथे सुरू झाली आहेत.
पावसाळा अर्थात सर्वाधिक आजारपण ओढवणाऱ्या विद्यमान मोसमात ‘हेल्थस्प्रिंग’ने मुंबईकरांसाठी पहिल्यावहिल्या मान्सून हेल्पलाइनची घोषणा केली आहे. १० जुलै ते ऑगस्टअखेर असे दोन महिने सुरू राहणाऱ्या या मदतवाहिनीअंतर्गत विविध ४० उच्च-गुणवत्तेच्या डॉक्टरांबरोबर थेट फोनवरून विनामूल्य सल्लामसलत मुंबईकरांना करता येईल. वैद्यक-निगेची तातडीने गरज आहे काय, याची चाचपणी करण्यासाठी ५८८८८ या क्रमांकावर इच्छुकांनी ‘ऊडउळडफ’ असा एसएमएस केल्यानंतर, हेल्थस्प्रिंगद्वारे डॉक्टरचा मोबाइल क्रमांक कळविला जातो, ज्यांच्याशी गरज पडेल तेव्हा कितीही वेळा संवाद साधून शंकानिरसन करण्याची संधी इच्छुकांना मिळेल.