केंद्रीय अर्थसंकल्पाचे भाषण सुरु असताना शेअर बाजारात मात्र निराशेचे वातावरण दिसत होते. यावेळी सेन्सेक्समध्ये तब्बल ६०० अंशांची घसरण झाली होती. सेन्सेक्सने २२,४९४.६१ ची नीचांकी पातळी गाठली होती. मात्र, आता मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सावरताना दिसत आहे. एकुणच अर्थसंकल्पाकडून शेअर बाजाराची निराशा झाल्याचे चित्र आहे. सध्यादेखील बाजारात सातत्याने चढ-उतार पहायला मिळत आहेत.

पेट्रोल मोटारीवर एक टक्का सेस तर डिझेल मोटारींवर २.५ टक्के सेस लावला जाणार आहे. तसेच १० लाखांपेक्षा अधिक किंमतीच्या गाड्या महाग होणार आहे. त्यामुळे वाहननिर्मिती क्षेत्राला फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या, मुंबई शेअर बाजारात टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, एसबीआय आणि रिलायन्स यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले आहे. तर आयटीसी, मारुती, झी, विप्रो आणि सिप्ला कंपनीचे शेअर्स सर्वाधिक घसरले आहेत.