scorecardresearch

रोखे बाजाराकडे पाठ ; मार्च तिमाहीत रोख्यांमधील १.२ कोटींचा निधी आटला

म्युच्युअल फंडातील रोखेसंलग्न एकूण १६ श्रेणींपैकी १५ श्रेणींमधून गुंतवणूकदारांनी निधी काढून घेतला आहे. मार्च तिमाहीत फक्त ओव्हरनाइट फंडामध्ये ७,८०२ कोटी रुपयांच्या निधीचा ओघ राहिला होता. रोखेसंलग्न म्युच्युअल फंडातून मार्च महिन्यात तब्बल १.१५ लाख कोटी रुपये गुंतवणूकदारांनी काढून घेतले. तर याआधीच्या फेब्रुवारी आणि जानेवारीमध्ये गुंतवणूकदारांनी अनुक्रमे ८,२७४ कोटी आणि ५,०८७ कोटींची गुंतवणूक केल्याचे अनुभवले.

नवी दिल्ली : बॅंकेच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजदरामध्ये दिवसेंदिवस कपात होत असल्याने गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडाकडे ओढा वाढला आहे. मात्र दुसरीकडे रोखे बाजाराकडे मात्र गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली आहे. रोखेसंलग्न म्हणजेच डेट म्युच्युअल फंडातून सरलेल्या मार्च तिमाहीमध्ये गुंतवणूकदारांनी १.२ कोटी रुपयांचा निधी काढून घेतला आहे, असे मॉर्निगस्टार इंडियाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आले आहे.

मॉर्निगस्टार इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, रोखे संलग्न म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्ता (एयूएम) मार्च अखेर १३ लाख कोटींवर पोहोचली आहे. जी गेल्यावर्षी याच तिमाहीत १४.०५ लाख कोटी नोंदली गेली होती. गुंतवणूकदारांनी सरलेल्या तिमाहीत म्हणजेच डिसेंबर २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत म्युच्युअल फंडातील लिक्विड फंड, अल्प मुदतीचे फंड (शॉर्ट डय़ुरेशन) आणि कंपनी रोखे फंड यातून सर्वाधिक निधीचे निर्गमन झाले आहे.

सरलेल्या आर्थिक वर्षांत (२०२१-२२) रोखेसंलग्न म्युच्युअल फंडातून ६८,४७१ कोटी रुपयांच्या निधीचे निर्गमन झाले होते. मात्र त्याच वर्षांत रोखेसंलग्न फंडांमध्ये गुंतवणूकदारांनी २.३ लाख कोटींची गुंतवणूक केली होती. तर डिसेंबर २०२१ च्या तिमाहीत २१,२७७ कोटी रुपयांची गुंतवणूक नोंदवली होती.

म्युच्युअल फंडातील रोखेसंलग्न एकूण १६ श्रेणींपैकी १५ श्रेणींमधून गुंतवणूकदारांनी निधी काढून घेतला आहे. मार्च तिमाहीत फक्त ओव्हरनाइट फंडामध्ये ७,८०२ कोटी रुपयांच्या निधीचा ओघ राहिला होता. रोखेसंलग्न म्युच्युअल फंडातून मार्च महिन्यात तब्बल १.१५ लाख कोटी रुपये गुंतवणूकदारांनी काढून घेतले. तर याआधीच्या फेब्रुवारी आणि जानेवारीमध्ये गुंतवणूकदारांनी अनुक्रमे ८,२७४ कोटी आणि ५,०८७ कोटींची गुंतवणूक केल्याचे अनुभवले.

इक्विटीकडे ओढा कायम

रशियाच्या युक्रेनवर आक्रमणानंतर बिघडलेल्या भू-राजकीय वातावरणात भांडवली बाजारात प्रचंड अस्थिरता असतानाही सरलेल्या मार्च २०२२ या तिमाहीत गुंतवणूकदारांनी समभागसंलग्न फंडामध्ये ६३,०५७ कोटींची गुंतवणूक केली आहे. एकूणच, म्युच्युअल फंडांमध्ये २०२१-२२ च्या चौथ्या तिमाहीत ३,९०० कोटी रुपयांचा निव्वळ प्रवाह आला. त्याआधीच्या तिमाहीत मात्र ८१९१५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Important information for mutual fund investors withdrawal of 1 2 lakh crores in march zws

ताज्या बातम्या