प्राप्तिकरदात्यांना १.१९ लाख कोटींचा परतावा वितरित

आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी (कर निर्धारण वर्ष २०२१-२२) ६७.९९ लाख करदात्यांना दिलेल्या १३,१४०.९४ कोटी रुपयांचा परतावादेखील समाविष्ट आहे.

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत १.०२ लाखांहून अधिक करदात्यांना १.१९ लाख कोटी रुपयांहून अधिक प्राप्तिकराचा परतावा (रिफंड) जारी करण्यात आला आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने गुरुवारी दिली. यामध्ये आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी (कर निर्धारण वर्ष २०२१-२२) ६७.९९ लाख करदात्यांना दिलेल्या १३,१४०.९४ कोटी रुपयांचा परतावादेखील समाविष्ट आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (सीबीडीटी) प्राप्तिकर परताव्याच्या प्रक्रियेअंतर्गत १ एप्रिल २०२१ ते १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत १.०२ लाख करदात्यांना १,१९,०९३ कोटी रुपयांहून अधिक परतावा जारी केला गेला आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने ट्वीटद्वारे दिली. सीबीडीटीने दिलेल्या माहितीनुसार, एक कोटींहून अधिक प्रकरणांमध्ये करदात्यांना ३८,०३४  कोटी रुपयांचा वैयक्तिक प्राप्तिकर परतावा मिळाला आहे. यासह कंपनी कराच्या बाबतीत १.८० लाखांहून अधिक प्रकरणांमध्ये ८१,०५९ कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Income tax refunds of rs 1 19 lakh crore to taxpayers in this fiscal zws

Next Story
ओंकार स्पेशिअ‍ॅलिटीचा चिपळूणमध्ये नवा प्रकल्प
ताज्या बातम्या