Income Tax Return : तुम्ही जरी प्राप्तिकराच्या कक्षेत येत नसाल तरी आटीआर नक्की भरा. २०२१-२२ आणि मूल्यांकन वर्ष २०२२-२३ साठी प्राप्तिकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया १५ जून २०२२ पासून सुरू झाली आहे. तुम्ही अद्याप तुमचे रिटर्न भरले नसेल, तर ते लवकरच भरा. कारण आयटीआर भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जर तुम्हाला तुमच्या कार्यालयातून फॉर्म-१६ मिळाला असेल, तर विलंब न करता तो भरा. जर तुम्ही अंतिम मुदतीपूर्वी तो भरला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. याशिवाय, जेव्हा आयकर ई-फायलिंग वेबसाइटवर अधिक करदाते रिटर्न फाइल करतात तेव्हा वेबसाइटवरील भार वाढतो. अशा परिस्थितीत तुम्हालाही आयकर भरताना येणाऱ्या अडचणी टाळायच्या असतील तर शेवटच्या क्षणाची वाट पाहू नका.

Photos : आर्थिक गुंतवणुकीसाठी ‘हे’ आहेत सर्वोत्तम पर्याय; जाणून घ्या अधिक तपशील

आर्थिक वर्ष २०२१-२२ आणि मूल्यांकन वर्ष २०२२-२३ साठी कोणत्याही विलंब शुल्काशिवाय आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२२ आहे. जर तुम्ही मुदतीनंतर इन्कम टॅक्स रिटर्न भरले तर तुम्हाला कलम २३४ए आणि आयकराच्या कलम २३४एफ अंतर्गत दंडासह करावरील व्याज भरावे लागेल.

Income Tax Return : मूल्यांकन वर्ष २०२२-२३ साठी ITR भरण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक? जाणून घ्या

वैयक्तिक एचयूएफसाठी आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२२ आहे, तर ज्यांना ऑडिटची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२२ आहे. तर टीपी अहवाल आवश्यक असलेल्या अशा व्यवसायासाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२२ आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही वैयक्तिक रिटर्न भरत असाल तर ते लवकर भरा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Income tax return fill itr for the year 2022 23 as soon as possible otherwise a fine will have to be paid know the deadline pvp
First published on: 25-06-2022 at 18:15 IST