सोन्यावरील आयात शुल्क वाढले

सरकारने मौल्यवान धातूवरील आयात शुल्क बुधवारी वाढवले.

gold bars, सोन्याची बिस्कीटे
संग्रहित छायाचित्र

सरकारने मौल्यवान धातूवरील आयात शुल्क बुधवारी वाढवले. प्रत्येक १० ग्रॅमसाठीच्या सोन्यावर ३४७ डॉलर आयात शुल्क लागू करण्यात आले आहे. (बुधवारच्या डॉलरच्या तुलनेतील ६६.७३ रुपयांनुसार) भारतीय चलनात हे मूल्य २३,१५५ रुपये आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये होत असलेल्या बदलामुळे ही रचना करण्यात आल्याचे केंद्रीय उत्पादन व सीमाशुल्क मंडळाने स्पष्ट केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Increased import duty on gold