मुंबई : अनियंत्रित महागाईला लगाम म्हणून अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हने बुधवारी व्याजदरात थेट पाऊण टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आणि परिणामी जगभरातील भांडवली बाजारात समभाग विक्रीचा चौफेर मारा सुरू झाला. देशांतर्गत भांडवली बाजारावर देखील त्याचे प्रतिकूल पडसाद उमटल्याने प्रमुख निर्देशांकांमध्ये सुमारे दोन टक्क्यांची पडझड झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये १,०४५.६० अंशांची घसरण होत ५१,४९५.७९ पातळीवर बंद झाला. त्याने दिवसभरातील उच्चांकी पातळीपासून १७१७.०२ अंशांची गटांगळी खात ५१,४२५.४८ ही गत वर्षभरातील (५२ सप्ताहातील) नवीन नीचांकी पातळी गाठली. त्यापाठोपाठ राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३३१.५५ अंशांची घसरण झाली आणि तो १५,३६०.६० पातळीवर स्थिरावला. निफ्टीने देखील १५,३३५.१० हा गत वर्षभरातील नवीन तळ गाठला.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Index lows for years sensex plunges points uncontrolled inflation ysh
First published on: 17-06-2022 at 00:02 IST