scorecardresearch

Biggest Economies In World: सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत Top 5 मध्ये; ब्रिटनला मागे टाकलं, एकूण मूल्य आहे…

जागतिक नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार जगातील पाच सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये अमेरिका अव्वल स्थानी आहे.

Biggest Economies In World: सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत Top 5 मध्ये; ब्रिटनला मागे टाकलं, एकूण मूल्य आहे…
भारत अव्वल पाचमध्ये तर अमेरिका अव्वल स्थानी

जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीमध्ये भारताने अव्वल पाच देशांमध्ये स्थान मिळावलं आहे. ब्लुमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार ब्रिटनला मागे टाकत भारताने हा मान मिळवला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने २०२१ च्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेहून सरस कामगिरी केल्याचं असल्याचं ब्लुमबर्गने म्हटलं आहे.

या अहवालामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार हा मार्च महिन्यामध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये ८५४.७ बिलियन अमेरिकी डॉलर्स इतका आहे. याचवेळी ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचा आकार हा ८१६ बिलियन अमेरिकी डॉलर्स इतका आहे. डॉलरचे मूल्य आणि इतर गोष्टी प्रमाण ठेऊन ही आकडेवारी सादर करण्यात आली आहे.

जागतिक नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार जगातील पाच सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये अमेरिका अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीन, तिसऱ्या क्रमांकावर जपान तर चौथ्या क्रमांकावर जर्मनी आहे. या देशांच्या अर्थव्यवस्थेचा आकार नेमका किती आहे हे पाहूयात…

अमेरिका २५ हजार ३५० बिलियन अमेरिकी डॉलर्स
चीन १९ हजार ९१० बिलियन अमेरिकी डॉलर्स
जपान ४ हजार ९१० बिलियन अमेरिकी डॉलर्स
जर्मनी ४ हजार २६० बिलियन अमेरिकी डॉलर्स
भारत ८५४.७ बिलियन अमेरिकी डॉलर्स

भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ १३.५ टक्के…
भारत सरकारने पहिल्या तिमाहीमधील जीडीपीसंदर्भातील आकडेवारी जाहीर केल्यानंतर दोन दिवसांनी भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भातील जागतिक स्तरावरील ही तुलनात्मक माहिती समोर आली आहे. वार्षिक तुलनेनुसार भारतीय अर्थव्यवस्था ही १३.५ टक्क्यांनी वाढत असल्याचा दावा भारत सरकारने आपल्या आकडेवारीत केलेला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्यक्त केलेल्या शक्यतेपेक्षा ही वाढ कमी असली तरी विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेंशी तुलना करता ही सर्वात वाढ आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या