देशामधील परदेशी मुद्रा म्हणजेच परकीय चलन गंगाजळीमध्ये मोठी घट झाली आहे. सात जानेवारी २०२२ रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये भारतामधील परकीय चलनामध्ये ८७.८ कोटी डॉलर्सने घट झालीय. आता भारतामध्ये ६३२.७३६ अब्ज डॉलर एवढं परकीय चलन शिल्लक आहे. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयने यासंदर्भातील आकडेवारी जारी केली आहे. परदेशी गंगाजळीमध्ये सातत्याने होणारी घट ही केंद्र सरकारसाठी चिंता वाढवणारी गोष्ट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यापूर्वी ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या आटवड्यामध्ये परदेशी चलन हे १.४६६ अब्ज डॉलर्सचे कमी होऊन ६३३.६१४ अब्ज डॉलर्सवर आलं होतं. तर २४ डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परदेशी चलनामध्ये ५८.७ कोटी डॉलरर्सची घट झाली होती. त्यावेळी परकीय चलन ६३५.०८ अब्ज डॉलर्सपर्यंत आलेलं. १७ डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा १६ कोटी डॉलर्सने घसरुन ६३५.६६७ अब्ज डॉलर्स वर आला होता.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India forex reserves down to 632 billion usd as of 7 jan rbi data scsg
First published on: 15-01-2022 at 09:33 IST