भारताच्या खनिज तेल उत्पादनाला घरघर कायम

जुलैमध्ये खनिज तेलाचे उत्पादन २५ लाख टन नोंदविण्यात आले.

जुलैमध्ये ३.२ टक्के घट

इंधन भूक भागविण्यासाठी जवळपास ८५ टक्के मदार आयातीवर असणाऱ्या भारतात देशांतर्गत खनिज तेलाच्या उत्पादनात घसरणीचा क्रम कायम असून, सरलेल्या जुलैमध्ये ते आणखी तीन टक्क्यांनी गडगडले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील ‘ओएनजीसी’ने अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन घेतल्याचा हा परिणाम आहे.

जुलैमध्ये खनिज तेलाचे उत्पादन २५ लाख टन नोंदविण्यात आले. जे मागील वर्षातील याच महिन्याच्या तुलनेत ३.२ टक्क्यांनी घसरले आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जुलै या चार महिन्यांसाठी उत्पादन ९९ लाख टन इतके राहिले, त्यातही गेल्या वर्षाच्या तुलनेत ३.३७ टक्के अशी घट झाली आहे, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून मंगळवारी देण्यात आली.

सार्वजनिक मालकीच्या ओएनजीसीचे जुलैमधील उत्पादन १६ लाख टन म्हणजे मागील वर्षाच्या जुलैच्या तुलनेत ४.२ टक्क्यांनी घटले. त्या उलट रिलायन्स-बीपी यांच्या संयुक्त भागीदारीतील केजी-डी६ खोऱ्यातून जुलैमधील नैसर्गिक वायू उत्पादन, वर्षागणिक १८.३६ टक्के वाढीसह २९ अब्ज घनमीटरवर पोहचल्याचे चित्र दिसून आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India oil production akp

Next Story
अँकरचा बिगर इलेक्ट्रीक स्विच व्यवसायावर भर
ताज्या बातम्या