फोक्सव्ॉगनच्या वाहनांचा पर्यावरण विषयक नियमनाच्या पालनांबाबतचा तपास भारतात सुरू झाला असून त्यात काही गैर आढळून आल्यास कंपनीविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
फोक्सव्ॉगनच्या वाहनांच्या दर्जा तपासाचे आदेश केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ या वाहन संशोधक संस्थेला दिले आहेत. याबाबत कंपनीकडून सविस्तर माहिती मागविण्यात आली असून त्याबाबत प्रतीक्षा असल्याचे संस्थेच्या संचालिका रश्मी उध्र्वरेषे यांनी सांगितले. संस्था तपासासाठी नमुने घेणार असून तथ्य आढळल्यास कारवाई केली जाईल, असेही त्या म्हणाल्या.