सुरुवातीचे नुकसान भरून काढतानाच मंगळवारच्या तुलनेत एक पैशाने वधारलेल्या रुपयाने बुधवारी सप्ताह तळातून बाहेर येण्याचा यशस्वी प्रयत्न केला. डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलन ६०.१३ वर स्थिरावले. ६०.२३ या किमान स्तरावर दिवसाचा प्रवास सुरू करणारा रुपया दिवसअखेर चलन व्यवहारातील उच्चांकी स्थितीवर स्थिरावला. रुपयाचा ६०.३८ हा सप्ताह नीचांक राहिला आहे.
सोने-चांदी दर सुखावले
सराफा बाजारात बुधवारी मौल्यवान धातूंचे दर काही प्रमाणात खाली आले. शहरात स्टॅण्डर्ड सोने तोळ्यामागे १९५ रुपयांनी कमी होत २८,१५५ रुपयापर्यंत घसरले. तर चांदीचा दरदेखील बुधवारी एकदम किलोसाठी ४९० रुपयांनी खाली येत त्याला ४५ हजारांपर्यंतचा भाव मिळाला. चांदीचा दर गेल्या काही दिवसांत कमालीचा उंचावला आहे.