scorecardresearch

महागाई दर वाढून नोव्हेंबरमध्ये ४.९१ टक्क्यांवर

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर आधीच्या ऑक्टोबर २०२१ मध्ये ४.४८ टक्के पातळीवर होता

किरकोळ किमतीवर आधारित महागाई दर नोव्हेंबरमध्ये किंचित वाढून ४.९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुख्यत्वे, अवकाळी पावसामुळे अन्नधान्य, फळ व भाज्यांच्या किमतीत वाढ झाल्याचा हा परिणाम असल्याचे सरकारकडून सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीने दर्शविले.

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर आधीच्या ऑक्टोबर २०२१ मध्ये ४.४८ टक्के पातळीवर होता, तर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याने ६.९३ टक्क्यांची चिंताजनक पातळी गाठली होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अन्नधान्य महागाई ही आधीच्या महिन्यांतील ०.८५ टक्क्यांच्या तुलनेत सरलेल्या नोव्हेंबरमध्ये १.८७ टक्के होती.

रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण ठरविताना प्रामुख्याने किरकोळ महागाई दराला लक्षात घेतला जातो.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Inflation rate prices of fruits and vegetables this is the result of growth akp

ताज्या बातम्या