scorecardresearch

अल्पबचत योजनांचे व्याजदर तूर्त ‘जैसे थे’

आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीपासून अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अल्पबचत योजनांच्या व्याजदरात कोणतेही बदल केलेले नाहीत. त्यामुळे १ एप्रिल २०२२ ते ३० जून २०२२ या तिमाहीसाठी सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत पत्र (एनएससी) तसेच अन्य अल्पबचत आणि पोस्टाच्या योजनांचे व्याजदर सध्या आहेत त्याच पातळीवर कायम राहतील, असा निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी जाहीर केला.

आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीपासून अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. अल्पबचत योजनांच्या व्याजदराबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून दर तिमाहीला आढावा घेऊन, दर निर्धारित केले जात असतात. 

प्रमुख अल्पबचत योजना             व्याजदर (%)

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ)   ७.१ टक्के

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी)        ६.८ टक्के

सुकन्या समृद्धी योजना                ७.६ टक्के

किसान विकास पत्र                  ६.९ टक्के

ज्येष्ठ नागरिक बचत योजना            ७.४ टक्के

एक वर्षांची मुदत ठेव योजना           ५.५ टक्के

बँक बचत खाते                   ४ टक्के

पोस्ट आवर्ती ठेव (५ वर्षे)              ५.८ टक्के

पोस्ट मासिक बचत योजना              ६.६ टक्के

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Interest rates on small savings schemes are remain same zws

ताज्या बातम्या