पीटीआय, नवी दिल्ली : झी एंटरटेन्मेंट एंटरप्राइझेसमधील सर्वात मोठा भागीदार असणाऱ्या इन्व्हेस्कोने विरोधाचा पवित्रा बदलत, गुरुवारी तिचे झी-सोनी विलीनीकरण कराराला समर्थन असल्याचे घोषित केले. झी एंटरटेन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत गोएंका आणि दोन स्वतंत्र व्यवस्थापकीय संचालकांना काढून टाकण्यासाठी भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) बोलविण्याचा निर्णय देखील मागे घेत असल्याचे इन्व्हेस्कोने जाहीर केले. गेल्या वर्षी  ‘झी एन्टरटेन्मेन्ट एंटरप्राइझेस लिमिटेड’च्या (झील) संचालक मंडळाने ‘सोनी पिक्चर्स नेटवर्क्‍स इंडिया’ या समूहाबरोबर तत्त्वत: विलीनीकरणाला मान्यता दिली होती. सुरुवातीला विरोध केल्यांनतर, इन्व्हेस्कोने आता हे विलीनीकरण झीच्या भागधारकांसाठी फायदेशीर आहे असे म्हणत त्याचे समर्थन केले आहे. मात्र सद्य:स्थितीत प्रस्तावित केल्याप्रमाणे विलीनीकरण पूर्ण न झाल्यास इन्व्हेस्कोने नवीन विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्याचा निर्णयाधिकार राखून ठेवला आहे. झी-सोनी या दोन समूहांमध्ये तब्बल दीड अब्ज डॉलरचा करार झाला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने इन्व्हेस्कोचा ईजीएम बोलविण्याचा अधिकार कायदेशीररीत्या वैध असल्याचे सांगत इन्व्हेस्कोच्या बाजूने कौल दिला होता.

दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर तयार होणाऱ्या नवीन कंपनीच्या संचालक मंडळाची मोठय़ा प्रमाणात पुनर्रचना केली जाईल, ज्यामुळे कंपनीचे संचालक मंडळ अधिक प्रबळ करण्याचे आमचे उद्दिष्ट साध्य होईल. दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरण प्रक्रियेवर कंपनी लक्ष ठेवून असून, प्रस्तावित योजनेप्रमाणे ते मार्गी न लागल्यास विशेष सभा बोलविली जाऊ शकेल, असे इन्व्हेस्कोने म्हटले आहे.

kasturi cotton
कस्तुरी कॉटन…देशातील सर्वोत्तम कापूस!
WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
pegasus apple advisory
iPhone वर ‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरचे संकट, खासगी डेटावर हॅकर्सची संभाव्य ‘नजर’; उपाय काय?
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’

विलीनीकरणामुळे झी समूहाकडे असलेला २ लाख ६० हजार तासांचा दूरचित्रवाहिनीसाठी बनवण्यात आलेला दृकश्राव्य ऐवज (कण्टेण्ट) तसेच हिंदीतील सर्वाधिक चित्रपटांचे आणि अन्य भाषांतील ४,८०० चित्रपटांचे हक्क सोनी पिक्चर्सला उपलब्ध होणार आहेत. तर सोनी पिक्चर्सच्या १६७ देशांमध्ये असलेल्या नेटवर्कचा आणि ७० कोटी प्रेक्षकसंख्येचा फायदा झी समूहाला घेता येणार आहे.

झी एंटरटेन्मेंटच्या समभागाची उसळी

 इन्व्हेस्कोने विरोधातील पवित्रा मागे घेतल्याने याचे चांगले पडसाद झी एंटरटेन्मेटच्या समभाग मूल्यांत उमटले. गुरुवारच्या सत्रात दिवसअखेर हा समभाग बीएसईवर १६.८३ टक्क्यांनी वधारून २९९.१५ रुपयांवर बंद झाला. दिवसभरातील व्यवहारात समभागाने २० टक्क्यांच्या वरच्या सर्किटसह, ३०७.२५ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती.