यंदा अशी करा गुंतवणूक!

शेअर बाजारातील गुंतवणुकीची अचूक वेळ गाठणे महत्त्वाचे नसून बाजारात वेळ घालवणे आवश्यक आहे.

संयम
– शेअर बाजारातील गुंतवणुकीची अचूक वेळ गाठणे महत्त्वाचे नसून बाजारात वेळ घालवणे आवश्यक आहे.
– गुंतवणूक म्हणजे टी – २० चा खेळ नाही. गुंतवणूक ‘टेस्ट मॅच’सारखी असते जिथे कोणते चेंडू टोलवायचे हे हातात असते.
साधेपणा
– जटील आणि किचकट उत्पादनांमधूनच सर्वाधिक परतावा मिळतोच, असे नसते.
– बंद मुदतीचे फंड, विम्याच्या आवरणात गुंडाळलेली गुंतवणुकीची साधने यांच्या गुणवत्तेचे परीक्षण करावे.
संशयी बना
पसे कमावण्यापेक्षा ते न गमवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक योजनेबद्दल संशयाच्या भूमिकेत असणे आवश्यक आहे.
– भारत ही एक विकसनशील बाजारपेठ आहे. या बाजारपेठेवर परदेशी संस्थात्मक गुंतवणुकीचा बराच प्रभाव आहे. त्यामुळे चढ – उतार होत राहतात.  – कोणतीही गुंतवणूक ५० टक्क्यांनी कोसळत असेल तर तिला पुन्हा त्याच पातळीवर येण्यासाठी १०० टक्क्यांनी उसळी मारावी लागते.
–    जी आर्थिक उत्पादने कळत नाहीत त्यात गुंतवणूक करू नका. त्यासाठी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
– अनियंत्रित उत्पादने किंवा योजनांमध्ये गुंतवणूक करू नका.
सुरक्षा यंत्रणा निर्माण करा
एखाद्या अनपेक्षित घटनेुळे तुमचे आर्थिक उद्दिष्ट डळमळीत होऊ शकते. त्यामुळे भविष्यातली आर्थिक उद्दिष्ट निश्चित करण्यापूर्वीची पहिली पायरी म्हणजे सुरक्षेची तरतूद.
– आपत्कालीन निधीची उभारणी करा. ती तुम्हाला अनिश्चिततेच्या काळात (नोकरी जाणे/अपघात) संरक्षण देईल. अशा घटनांमध्ये सर्वसाधारणपणे ४ ते ६ महिन्यांचा पगार पुरेसा असतो.
– आपल्यावरच्या जबाबदाऱ्यांना विम्याचे संरक्षण देणे. हा विमा परतावा न देता जोखीम व्यवस्थापनाचे काम करतो.
–    साध्या परिमाणांचा विचार करा. जसे –
रोकड मालमत्ता = १० टक्के आर्थिक पत
जबाबदारी = उत्पन्नाच्या ४० टक्के
– मृत्यूपत्र लिहा आणि दरवर्षी ते अद्ययावत करा.
– बँकेतील बचत खाते असो किंवा म्युच्युअल फंडातली गुंतवणूक आपल्या मालमत्तेमध्ये नामनिर्देशितांची/लाभधारकांची नावे जोडत रहा.
आर्थिक पत जाणून घ्या
– हे सध्या केले नसेल तर नवीन वर्षांत ते नक्की करा. नवीन वर्षांत आपली आर्थिक पत नक्की जाणून घ्या. आर्थिक पत समजून घेतली की त्यातून तुमचे आर्थिक आरोग्यही कळेल आणि त्याप्रमाणे आर्थिक उद्दिष्ट गाठता येतील.
– तुमच्या उत्पन्नाहून हे भिन्न आहे. आर्थिक पत म्हणजे मालमत्ता आणि जबाबदारी यांमधील फरक होय.
– आपली मालमत्ता आणि जबाबदारीकडे काळजीपूर्वक पाहिले तर सध्या तुम्ही कशावर खर्च करता आणि बचत किती होते याचे स्पष्ट चित्र समोर येईल. त्यातून खर्च आणि बचतीच्या कोणत्या सवयींमध्ये बदल घडवून आणला पाहिजे, हेही कळेल.
– आर्थिक पत हा कोणत्याही घराचे एक महत्त्वाचे अंग आहे. कारण त्यातून त्या कुटुंबाने इतर आर्थिक उद्दिष्टांसाठी उभारलेल्या निधीचा अंदाज येतो जो आणीबाणीच्या काळात (नोकरी गेल्यास) तसेच त्यातून निवृत्ती पश्चात उत्पन्नही मिळेल.
– दरवर्षी आपली आर्थिक पत नव्याने तपासणे ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. ज्यामुळे तुम्ही आपल्या आर्थिक उद्दिष्टांच्या कितपत जवळ पोहोचला आहात तसेच तुमच्या आर्थिक प्रगतीचाही अंदाज येईल. शिवाय कर्जाचे डोंगर उभे राहण्यापूर्वी आपल्या आर्थिक चुका सुधारण्याची संधीही मिळेल.
आर्थिक उद्दिष्टय़े ठरवा
– आठवडय़ाचे/महिन्याचे बजेट तयार करून जबाबदारी नियंत्रणात आणा. उदा. उत्पन्न आणि खर्चात मोठी तफावत निर्माण करण्यात क्रेडिट कार्डाचा मोठा हात असतो. क्रेडिट कार्डाचा वापर आणि दररोजच्या कामकाजामध्ये आर्थिक जबाबदारी पुढे ढकलणे टाळा.
– अवास्तव आणि भरपूर आर्थिक उद्दिष्ट ठरवू नका. अन्यथा यापकी एकही उद्दिष्ट पूर्णत्वास जाणार नाही.
– नवीन वर्षांत आपला आर्थिक संकल्प सोपा आणि स्पष्ट बनवण्याची ही संधी समजा.
– वर्षभरातली तुमची कामगिरी तपासण्यासाठी चेकलिस्ट तयार करणे ही एक चांगली कल्पना आहे. त्यामुळे योग्य ते बदल करणे शक्य होईल. आपली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आर्थिक सल्लागाराला भेटा.
आपला पोर्टफोलिओ पुढील मुद्यांवरून तपासा :
मालमत्तेचे वितरण, केंद्रीकरण, – लिक्विडिटी, जोखीम.
आपल्या गुंतवणुकीबाबत भावूक बनू नका. स्वत:च तज्ज्ञ बनण्याचा प्रयत्न करू नका. आर्थिक सल्ला देण्यास सक्षम ‘आर्थिक डॉक्टर’शी सल्लामसलत करा.
अंशू कपूर
(लेखक एडलवाइजच्या जागतिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आहेत.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Investment tips for financial year 2014

ताज्या बातम्या