scorecardresearch

‘एजीएस’ समभाग घसरणीसह सूचिबद्ध

वारी एजीएस ट्रान्झॅक्टच्या समभागाने मुंबई शेअर बाजारात १७६ रुपयाच्या पातळीवरून व्यवहारास सुरुवात केली.

मुंबई:  नववर्षांतील पहिली प्रारंभिक समभाग विक्री असलेल्या डिजिटल वित्तीय सेवा क्षेत्रातील एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीजच्या समभागाने गुंतवणूकदारांची निराशा केली आहे.

सोमवारी एजीएस ट्रान्झॅक्टच्या समभागाने मुंबई शेअर बाजारात १७६ रुपयाच्या पातळीवरून व्यवहारास सुरुवात केली. प्रति समभाग १७५ रुपये किमतीला प्रारंभिक भागविक्रीतून हा समभाग गुंतवणूकदारांनी मिळविला असून, त्याने बाजारात पहिले पाऊल फक्त ०.९ टक्के अधिमूल्यासह टाकले. त्यांनतर समभागात घसरण झाली. दिवसभरातील व्यवहारात या समभागाने १८१.८५ रुपयांचा किमतीतील उच्चांकही गाठला. दिवसअखेर तो प्रति समभाग १३.७० रुपयांच्या म्हणजेच ७.८३ टक्क्यांच्या घसरणीसह १६१.३० रुपये पातळीवर स्थिरावला.

गेल्यावर्षी पार पडलेल्या कंपन्यांच्या बहुतांश प्रारंभिक समभाग विक्रीत सहभागी होऊन गुंतवणूकदारांनी सूचिबद्धतेलाच चांगला परतावा मिळविला होता. मात्र नववर्षांतील पहिली प्रारंभिक समभाग विक्री असलेल्या एजीएस ट्रान्झॅक्टचा समभाग दमदार कामगिरी करू  शकला नाही.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Investors disappointed with shares of ags transact technologies zws