पाच हजार कोटींपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या सहकारी बँकांच्या वर्गवारीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘बँको पुरस्कार २०१५’ तर बँकिंग फ्रंटियर पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार अशा विशेष सन्मानांची मानकरी पुण्यातील जनता सहकारी बँक ठरली आहे.
बँको पुरस्काराचे वितरण गोव्याचे सहकारमंत्री महादेव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. जनता सहकारी बँकेचे सह-महाव्यवस्थापक अभय बापट यांनी हा पुरस्कार स्वीकारला, तर बँकेच्या नियोजन विभागाचे प्रमुख राधाकृष्ण लिमये याप्रसंगी उपस्थित होते.
बँकिंग फ्रंटियर मासिकाच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात ‘बेस्ट ग्रीन इनिशिएटिव्ह’ आणि ‘बेस्ट एटीएम इनिशिएटिव्ह’ या दोन पुरस्कार जनता सहकारी बँकेने पटकावले. रिझव्‍‌र्ह बँकेचे निवृत्त महाव्यवस्थापक व सहकारी बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ रत्नाकर देवळे यांच्या हस्ते बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत केतकर यांनी हे पुरस्कार स्वीकारले.
याप्रसंगी बँकेचे संचालक म. म. पवार, सह-महाव्यवस्थापक दिलीप कुलकर्णी, बँकेच्या डेटा सेंटर विभागाचे प्रमुख नीलेश देशपांडे उपस्थित होते.