‘जेट एअरवेज’चे मुख्य वित्तीय अधिकारी अमित अग्रवाल यांचा राजीनामा

वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संग्रहित छायाचित्र

आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजचे सह-मुख्य कार्यकारी आणि मुख्य वित्तीय अधिकारी अमित अग्रवाल यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हवाई सेवा क्षेत्रातील दुसरी मोठी कंपनी राहिलेल्या जेट एअरवेजवर सध्या स्टेट बँकेचे वर्चस्व आहे. कंपनीकडे स्टेट बँकेसह विविध १८ व्यापारी बँकांचे ८,००० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. ही सेवा सुरू राखण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचे आंशिक वेतन देण्यासाठी आवश्यक निधी बँकेने नाकारल्याने दोन आठवडय़ांपासून तिची विमाने जमिनीला खिळली आहेत.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कंपनीचे अमित अग्रवाल यांनी राजीनामा दिला. अमित अग्रवाल यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला आहे, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Jet airways deputy ceo and cfo amit agarwal quits due to personal reasons

ताज्या बातम्या